वाहनांवर निवडणूक विभागाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 09:25 PM2019-03-20T21:25:14+5:302019-03-20T21:25:36+5:30

लोकसभा निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या कालावधीत लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचेच कापडी फलक, झेंडे आदी बाबींसाठी आयोगाकडून नियम लागू करण्यात आले आहेत.

The Election Department's eye on the vehicles | वाहनांवर निवडणूक विभागाची नजर

वाहनांवर निवडणूक विभागाची नजर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या कालावधीत लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचेच कापडी फलक, झेंडे आदी बाबींसाठी आयोगाकडून नियम लागू करण्यात आले आहेत. प्रचाराच्या वाहनांवरही निवडणूक विभागाची करडी नजर राहणार आहे.
लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली असताना शहरात फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर पक्षाच्या नावाने नंबर प्लेट, मजकूर, जाहिराती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्यास प्रादेशिक परिवहन विभाग व स्थानिक पोलीस प्रशासनाकडून संयुक्तपणे कारवाई करण्यात येत आहे. या कालावधीत लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडावी, निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाºया वाहनांवर निवडणूक विभागाकडून कडक नियम लागू करणे आवश्यक आहे. त्याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ अन्वये फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनांच्या डाव्या बाजूला विंडो स्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही. आणि तो त्या वाहनाच्या टपापासून दोन फूट उंचीपेक्षा अधिक राहणार नाही.
प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहनचालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाच्या पक्ष प्रचाराच्या झेंडा किंवा कापडी फलकासंबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार, प्रतिनिधी यांच्या वाहनां व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही, असे आदेश निवडणूक विभागाकडून देण्यात आले आहेत. मतमोजणी होईस्तोवर आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली.
पक्षाच्या नंबर प्लेट लावून वाहन पळविणाऱ्यांना चाप
लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असताना शहरातून धावणाºया काही दुचाकी व चारचाकी वाहनांवर पक्षांच्या नावाने नंबर प्लेट मजकूर, जाहिराती प्रसारित होत असल्याचे दिसून येते. अशा वाहनांवर आचारसंहिता कलमान्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याने पक्षाच्या नंबर प्लेट लावून वाहने पळविणाऱ्यांना चाप बसणार आहे. तसेच ध्वनीक्षेपक लावलेल्या वाहनाला धावत्या वाहनातून प्रचार करता येणार नाही.

Web Title: The Election Department's eye on the vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.