सर्जीकल स्ट्राईकमुळे दशहतवादाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:31 PM2018-02-19T22:31:01+5:302018-02-19T22:31:24+5:30

पाकिस्तानातून फोफावलेला दहशतवाद भारताला बाधा पोहचवित आहे. यावर वारंवार नियंत्रण मिळविणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी सर्जीकल स्ट्राईक सारख्या मोहीम राबविल्यास दहशतवादाला ब्रेक लागतो, असे प्रतिपादन ले. जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी केले.

Due to a surgical strike, | सर्जीकल स्ट्राईकमुळे दशहतवादाला ब्रेक

सर्जीकल स्ट्राईकमुळे दशहतवादाला ब्रेक

Next
ठळक मुद्देराजेंद्र निंभोरकर : वडाळा जन्मभूमीत सत्कार हाच मोठा पुरस्कार

आॅनलाईन लोकमत
आष्टी (शहीद) : पाकिस्तानातून फोफावलेला दहशतवाद भारताला बाधा पोहचवित आहे. यावर वारंवार नियंत्रण मिळविणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी सर्जीकल स्ट्राईक सारख्या मोहीम राबविल्यास दहशतवादाला ब्रेक लागतो, असे प्रतिपादन ले. जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी केले.
वडाळा या जन्मभूमीत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या भावपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. रामदास तडस होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय जलसंपदा विभागाचे ओएसडी सुधीर दिवे, आ. अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सचिव धनंजय धवड, पी.आर. कॉलेजचे संस्थापक रामचंद्र पोटे, वडाळा सरपंच द्रोपदा बºहाणपुरे, वर्धपूरचे सरपंच लता पोटे, ग्रुप कॅप्टन सुधीर निंभोरकर, कॅप्टन विलास निंभोरकर व तिन्ही भावांच्या पत्नी मंचावर विराजमान होत्या.
यावेळी गुरूकुंज आश्रम मोझरी येथून आलेल्या चमुने भारत पाकीस्तान युद्धामधील ‘देश के प्यारे वीर शहीदो तुमको करू प्रणाम’ व स्वागतगीत सादर केले. यानंतर ले. जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्या संपूर्ण कार्याचा परिचय दिलीप निंभोरकर यांनी दिला.
यानंतर गावकºयांनी ले.जनरल यांना सलामी देत त्यांचा भावपूर्ण सत्कार केला सोबतच त्यांच्या दोन्ही भावांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना ले.जनरल राजेंद्र निंभोरकर म्हणाले की, आतापर्यंत जेवढे कर्तृत्वाचे मेडल मिळाले त्यापैकी गावकरी यांनी दिलेली गौरव व सत्कार हे माझ्या जीवनाचे सर्वात मोठे मेडल आहे.
यावेळी लता पोटे यांनी ले.जनरल यांच्या कार्याबद्दल उपवनसरंक्षक अमरावतीचे कविटकर यांनी वºहाडी भाषेत रचलेली कर्तव्यदक्षता ही कविता सादर केली. धनंजय धवड यांनी मन हाऊस ते गण हाऊस आत्मचरित्र लिहिण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर विविध सामाजिक संघटनांकडून त्यांचा सत्कार झाला. यावेळी शाल श्रीफळ, सन्मानपत्र, साडीचोळी देऊन तिन्ही भावंडासह त्यांच्या पत्नींचा सत्कार केला. संचालन प्रा. विनोद पेठे यांनी केले तर उपस्थितांचे आभार निष्ठा निंभोरकर यांनी मानले. यावेळी वडाळा, वर्धपूर येथील गावकरी तालुक्यातील नागरिक, अमरावती, नागपूर वर्धा येथून असंख्य नागरिक आले होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: Due to a surgical strike,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.