निधी नसल्याने पुलाची दुरूस्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:42 PM2018-07-20T22:42:19+5:302018-07-20T22:42:47+5:30

वर्धा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या गोजी ते येरणगाव या रस्त्यावर पूल खचलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे यामार्गावरून रहदारी बंद झाली आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य उज्वला पांडूरंग देशमुख यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद, बांधकाम विभाग यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात केली होती.

Due to lack of funds, the bridge has been repaired | निधी नसल्याने पुलाची दुरूस्ती रखडली

निधी नसल्याने पुलाची दुरूस्ती रखडली

Next
ठळक मुद्देगोजी-येरणगाव रस्त्यावर पूल खचला : अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार?

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या गोजी ते येरणगाव या रस्त्यावर पूल खचलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे यामार्गावरून रहदारी बंद झाली आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य उज्वला पांडूरंग देशमुख यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद, बांधकाम विभाग यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद वर्धा यांच्या कार्यकारी अभियंत्यांनी पूल दुरूस्तीसाठी हेड नाही आणि असे सांगून आम्ही या पूलाच्या दुरूस्तीचे काम करू शकणार नाही असे सांगितले. त्यांनी जिल्हा नियोजन व विकास अधिका ऱ्यांकडे निधीची व्यवस्था आहे. ते हे काम करू शकतात अशी माहिती उज्वला देशमुख यांना दिली. ज्या रस्त्यांवरून शेकडो गावातील नागरिकांची रहदारी आहे. अशा रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषद बांधकाम निधीची तरतूद करू शकत नसेल तर या ठिकाणी भविष्यात होणाºया अपघाताची जबाबदारी कुणाची असा सवाल देशमुख यांनी केला आहे. पुलाच्या दुरूस्तीसाठी जर निधी उपलब्ध होत नसेल तर अशा व्यवस्था काय कामाच्या असा प्रश्न उज्जवला देशमुख यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा परिषद सदस्यांना अशा कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. ग्रामीण भागाच्या विकासाकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्त्यांवरची वाहतूक बंद ठेवण्याची वेळ आता आली आहे. येरणगाव गोजी परिसरात नागरिकांना रहदारी बंद झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत असेही त्यांनी म्हटले आहे.
कात्री चौरस्ता रस्त्याची दैना
कात्री ते कात्री चौरस्ता रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने खड्ड्यांमध्ये पाणी जमा होऊन डबके तयार झाले आहे. येथून वाहन चालवितांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. कात्री येथील रस्त्याचे काम मागील एक दशकापूर्वी करण्यात आले होते. परंतु या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे या रस्त्याला अल्पावधीच खड्डे पडले. रस्त्यावरून चारचाकी वाहने तर सोडा परंतू दोनचाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग निंद्रावस्थेत आहे. भाजप पदाधिका ऱ्यांनी या रस्त्याच्या दुरस्ती कामाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये त्याच्याविषयी कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्ता दुरस्त करावा अशी मागणी आहे.

Web Title: Due to lack of funds, the bridge has been repaired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.