‘दुष्काळ’ संकट; ५७ विहिरी अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 08:51 PM2019-05-15T20:51:24+5:302019-05-15T20:51:57+5:30

जिल्ह्यात सध्या पाणी प्रश्न सध्या चांगलाच पेटत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी ५७ विहिरी अधिग्रहित करण्यात आला आहे. तर ६३ विंधन विहिरी आणि ६३ विशेष नळपाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती करण्यात आली आहे.

'Drought' crisis; 57 wells acquired | ‘दुष्काळ’ संकट; ५७ विहिरी अधिग्रहित

‘दुष्काळ’ संकट; ५७ विहिरी अधिग्रहित

Next
ठळक मुद्दे६३ विंधन विहिरींसह ६३ योजनांची दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सध्या पाणी प्रश्न सध्या चांगलाच पेटत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी ५७ विहिरी अधिग्रहित करण्यात आला आहे. तर ६३ विंधन विहिरी आणि ६३ विशेष नळपाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती करण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा (घा.) या दोन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या दोन तालुक्यातील गावांची संख्या २५८ इतकी आहे. यापैकी आष्टी तालुक्यात एक टँकर सुरू आहे. आर्वी तालुक्यातही दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाणवत आहे. आर्वी नगरपरिषदेमध्ये एक व आर्वी ग्रामीणमध्ये एक टँकर सुरू आहे. आष्टी आणि कारंजा तालुक्यातील ३८ हजार १२९ शेतकऱ्यांना १० कोटी १० लाख रुपयांचे दुष्काळी अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण ३५ हजार ५९ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतंर्गत नोंदणी केली होती. त्यापैकी ४० लाख १७ हजार रुपये ६४८ नुकसानग्रस्त व पीक विम्याच्या मोबदल्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांना अदा करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत वर्धा जिल्ह्यातील ८१ हजार २९९ लाख शेतकºयांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी ४० हजार शेतकºयांना ७ कोटी ८१ लाख रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकºयांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची १ हजार ६१४ कामे सुरू असून त्यावर २ हजार ७६६ मजूर उपस्थित आहेत. २१ हजार २०३ कामे शेल्फवर आहेत.

१.५६ कोटींची रक्कम केली महावितरणला अदा
पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची १ कोटी ५६ लाख रुपये इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीला देण्यात आली आहे. परिणामी, सर्व नळ पाणी पुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

Web Title: 'Drought' crisis; 57 wells acquired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.