जिल्ह्यात सरासरी ८२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:32 PM2017-10-16T23:32:22+5:302017-10-16T23:32:51+5:30

मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींकरिता सोमवारी मतदान झाले. या मतदानाकरिता नागरिकांत उत्साह असल्याचे दिसून आले.

The district has an average voter turnout of 82 percent | जिल्ह्यात सरासरी ८२ टक्के मतदान

जिल्ह्यात सरासरी ८२ टक्के मतदान

Next
ठळक मुद्दे८६ ग्रामपंचायतींकरिता झाले मतदान : ६०१ मतदारांचे भवितव्य मशीनबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींकरिता सोमवारी मतदान झाले. या मतदानाकरिता नागरिकांत उत्साह असल्याचे दिसून आले. दुपारपर्यंत झालेल्या नोंदीवरून मतदानाची टक्केवारी सरासरी ८२ वर जाईल, असे चित्र होते. दिवसभर मतदानादरम्यान कुठेही अप्रिय घटना घडल्याची माहिती नाही. एकंदरीत मतदानाची पक्रिया शांततेत पार पडल्याचे दिसून आले.
आज झालेल्या मतदानाकरिता ९६ हजार ६०१ मतदारांना हक्क बजावयाचा होता. याची पूर्ण तयारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली. असे असताना सुमारे २० टक्के नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ६४.३१ टक्के मतदान झाल्याची नोंद होती. मतदानाकरिता अजूनही सुमारे दोन तासाचा कालावधी शिल्लक असल्याने हा आकडा सरासरी ८० टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दुपारी ३.३० वाजेपर्यंत वर्धा तालुक्यात ५०.८६, सेलू ६६.४६, देवळी ६५.७७, आर्वी ६९.८६, आष्टी ७३.६५, कारंजा ६९.६७, हिंगणघाट ७१.८१ आणि समुद्रपूर येथे ७१.०५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. या नोंदीनंतर सुमारे दोन तास आणखी मतदान होणार असल्याने ही टक्केवारी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. डिसेंबर महिन्यात मुदत संपणाºया ग्रामपंचायतीकरिता आजचे मतदान होते. जिल्ह्यात तब्बल ११२ ग्रामपंचायतीत निवडणूक होणार होती; मात्र चिन्ह वाटपाच्या कारणावरून सेलू तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची निवडणूक पुढे ढकलली. यामुळे ८६ ग्रा.पं. करिता मतदान झाले. मतदानाच्या प्रक्रियेत कोणतीही गडबड होणार नाही याची दक्षता घेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. एकूण २७८ मतदान केंद्र सज्ज करण्यात आले होते. या केंद्रात सकाळी ७ वाजतापासून मतदानास सुरुवात झाली. सर्वच केंद्रावर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे दिसून आले. कुठूनही काही वाद किंवा कुण्या उमेदवारात वाद झाल्याची माहिती नव्हती.
सरपंचपदाचे ३०२ तर ६०१ सदस्यांचे भाग्य आज फळफळणार
गावाच्या विकासाचे सर्व अधिकारी ग्रामपंचायतीला देण्यात आल्याने सरपंचपद महत्त्वाचे झाले आहे. यामुळे या पदाकरिता अनेकांनी दावेदारी दाखल केली आहे. प्रत्येकालाच आपला विजय सहज दिसत असल्याचे प्रचाराच्या काळात त्यांच्या बोलण्यावरून दिसत होते. या उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. ते मंगळवारी होणाºया मोजणीतून समोर येईलच.
तालुका स्थळावर होणार मतमोजणी
आज झालेल्या मतदानाची मोजणी उद्या मंगळवारी सकाळी १० वाजतापासून होणार आहे. ही मोजणी तालुका स्थळावर होणार असून याकरिता प्रशासनाच्यावतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. वर्धा, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आष्टी आणि कारंजा येथे तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. तर सेलू येथे दिपचंद विद्यालय आणि आर्वी येथे गांधी विद्यालयात मतमोजणी होणार आहे.
आठही तालुक्यात होत असलेली ही मोजणी एकूण ७४ टेबलवरून होणार आहे. यात वर्धा तीन, सेलू दोन, देवळी १२, आर्वी नऊ, आष्टी तीन, कारंजा सहा, हिंगणघाट सहा, समुद्रपूर तीन असे टेबल लावण्यात आले आहेत. या टेबलवर एक पर्यवेक्षक आणि एक सहायक, असे ८८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. काही अडचण आल्यास २० कर्मचारी अतिरिक्त ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीच्या कामाकरिता एकूण १०८ कर्मचाºयांना नियुक्त करण्यात आले आहे.
मतमोजणी दुपारपर्यंत पूर्ण होण्याचे संकेत आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याकरिता पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त राहणार आहे.

जीप चालकावर गुन्हा
निवडणुकीतील वाहनाच्या गैरवापराचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात तहसीलदारांनी कृषी विभागाची जीप गाडी निवडणूक कामात वापरण्यासाठी रितसर घेतली असताना ती नियोजित ठिकाणी न ठेवता चालकाने परस्पर तिचा वापर केला. या प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून घोडमारे विरूद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तहसीलदारांच्या आदेशान्वये आवश्यकतेनुसार कृषी विभागाचे एमएच ३२ जे २७० क्रमांकाचे वाहन निवडणूक कामात वापरण्यासाठी असताना त्यावरील चालकाने ते परस्पर इतरत्र नेले. या कारणावरून चालकाने निवडणूक आचार संहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत त्याच्या विरूद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली. सेलू पोलिसांकडून भादंविच्या कलम १८८ व लोकप्रतिनिधी कायदा १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. या निवडणुकीत सेलू तालुका या ना त्या कारणाने चर्चेतच राहिल्याचे दिसून आले.

Web Title: The district has an average voter turnout of 82 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.