मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून उजळणार दोन रस्त्यांचे भाग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:38 AM2018-02-21T00:38:14+5:302018-02-21T00:38:35+5:30

स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत गोदावरी रस्ता डांबरीकरण केला नव्हता. तीन किमी अंतर मातीतून पार करावे लागत होते. टेकोडा रस्ताही रेतीघाटांमुळे दबला होता.

Destruction of two roads will be highlighted through Chief Minister's Gram Sadak Yojana | मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून उजळणार दोन रस्त्यांचे भाग्य

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून उजळणार दोन रस्त्यांचे भाग्य

Next
ठळक मुद्देगोदावरी व टेकोडा या दोन्ही रस्त्यांना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत गोदावरी रस्ता डांबरीकरण केला नव्हता. तीन किमी अंतर मातीतून पार करावे लागत होते. टेकोडा रस्ताही रेतीघाटांमुळे दबला होता. याबाबत अनेक वर्षांपासून पाठपुरावा केल्यानंतर दोन्ही रस्त्यांसाठी निधी मंजूर झाल्याची माहिती माजी आमदार दादाराव केचे यांनी दिली.
गोदावरी पोच रस्ता तीन किमी लांबीचा आहे. वर्धा नदीच्या काठी वसलेल्या या गावात जायला रस्ता नव्हता. दरवर्षी पावसाळ्यात पाणी आल्यावर चिखल तुडवीत मार्ग काढावा लागत होता. प्रकृती बिघडल्यावर रुग्णांना खाटेवर टाकून चार-पाच लोकांमिळून मुख्य मार्गावर आणावे लागत होते. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. सदर रस्ता जि.प. बांधकाम विभागाकडे होता; पण निधी नसल्याने रस्त्याच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. यासाठी माजी आमदार केचे यांनी २००९ पासून शासनदरबारी सतत पाठपुरावा केला. शेवटी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे.
टेकोडा अ‍ॅप्रोच रस्ता दीड किमी लांब आहे. या रस्त्याचे १९९८ मध्ये डांबरीकरण झाले होते; पण रेतीची अवजड वाहतूक झाल्याने पूर्ण रस्ता मातीत दबला. यामुळे बैलबंडी चालविणे तारेवरची कसरत होती. दोन्ही रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाची मागणी ग्रामस्थ केचे यांच्याकडे करीत होते. शेवटी गोदावरी व टेकोडा रस्त्याचे भाग्य उजळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या २०१७-१८ च्या बजेटमध्ये या रस्त्यांना प्राधान्य देऊन मंजुरी देण्यात आली. वर्षभरात दोन्ही रस्ते पूर्ण होईल, असेही केचे यांनी सांगितले. यावेळी जि.प. सदस्य अंकिता होेले, पं.स. सभापती नीता होले, राहुल बुले, शहराध्यक्ष अ‍ॅड. मनीष ठोंबरे, भाजप तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर, नगरसेवक अजय लेकुरवाळे, सुरेश काळबांडे, गजानन भोरे व कार्यकर्ते उपस्थित होते.
अवजड वाहतूक अधिक
गोदावरी आणि टेकोडा ही दोन्ही गावे रेतीघाटांची आहेत. यामुळे अवजड वाहनांची वाहतूक अधिक असते. परिणामी, रस्ते लवकर खराब होतात. यामुळे दोन्ही गावांत दर्जेदार रस्त्यांची निर्मिती गरजेची आहे.

Web Title: Destruction of two roads will be highlighted through Chief Minister's Gram Sadak Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.