पित्याची सुश्रृषा करणाऱ्या पुत्रावर नियतीचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:52 AM2018-08-15T00:52:38+5:302018-08-15T00:53:12+5:30

आजारी वडीलांची सेवा करण्यासाठी महाविद्यावयीन शिक्षण घेत असतांना वेळोवेळी लक्ष ठेवणाºया मुलांवर काळाने घाला घातला या घटनेने समाजमन ढवळून निघाले आहे.

Destroy the father of a father-in-law | पित्याची सुश्रृषा करणाऱ्या पुत्रावर नियतीचा घाला

पित्याची सुश्रृषा करणाऱ्या पुत्रावर नियतीचा घाला

Next
ठळक मुद्देयवतमाळच्या कॉलेजमध्ये आला झटका : अख्खे गाव हळहळले

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : आजारी वडीलांची सेवा करण्यासाठी महाविद्यावयीन शिक्षण घेत असतांना वेळोवेळी लक्ष ठेवणाºया मुलांवर काळाने घाला घातला या घटनेने समाजमन ढवळून निघाले आहे.
बढे ले-आऊट नाचणगाव रहिवासी रोजमजुरी करणारे रामराव सिरसकर हे पत्नी, मुलगी व मुलासह हे मागील एक महिन्यापासून ब्रेन हॅमरेज मुळे सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल आहेत. घरात अठरा विघ्ने दारिद्रय असतानाही त्यांनी आपल्या मुलीला अभियांत्रिकी शिक्षण दिले व लहान मुलगा हितेश यालाही यवतमाळ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश दिला. हितेश हा २२ वर्षीय तरुण अभियंता होण्याच्या मार्गावर असतानाच वडील रामराव यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यामुळे तो यवतमाळकडून नाचणगाव सतत येवून वडिलाच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवत होता. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला. आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावर असतानाच नियतीने त्याचा घात केला. आणि मृत्यु शय्येवर असणाºया पित्याला पाहून तो कॉलेज मध्ये असतानाच त्यांच्यावर मृत्यूने घाला घातला. नुकत्याच घडलेल्या हृदयाला पाझर फोडणाºया घटनेने संपूर्ण परिसर हळहळला.
रामराव सिरसकर पुलगाव कॉटन मील मध्ये कामगार होते. परंतु २००३ मध्ये मील बंद झाल्यामुळे रोजमजुरी करुन कुटुंबाचा गाडा चालवित होते. चार जणांच्या कुटुंबात मोठी मुलगी, मुलगा व वयोवृद्ध झालेले पती, पत्नी मील बंद झाल्यामुळे थोडी बहुत जी रक्कम मिळाली त्यात त्यांनी मुलीला उच्च शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभी राहावी म्हणून अभियंता बनविले. परंतु नौकरी नाही तर मुलगा हितेश हा यवतमाळ येथे अभियांत्रिक अभ्यासक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात शिक्षण घेत होता.
मुलांना उच्च शिक्षण देतांना आपल्या परिवाराच्या उज्वल भवितव्याची स्वप्ने रंगवित असताना त्यांना एक महिन्यापूर्वी ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकीकडे अभियांत्रिकी शिक्षणाचा बोझा तर दुसरीकडे मृत्यु शय्येवर असणारे वडील अश्या द्विधा मन:स्थितीत हितेश असतानाच रामराव कोमामध्ये गेले. टकटक पहाणाºया पलीकडे त्यांच्या शरीराची कुठलीच हालचाल होत नव्हती. परिस्थिती जेमतेमच, आजार मोठा, वडिलांना घरी आणण्या शिवाय पर्याय नव्हता तो मन घरी ठेवून कॉलेज जात होता. टकटक पाहणाºया वडिलाचा चेहरा त्याच्या डोळयापुढे सतत उभा राहणे स्वाभाविकच कारण जन्मदाता पिताच तो अशा विचित्र मन:स्थितीत असतानाच त्याला ७ आॅगस्ट रोजी यवतमाळ येथील कॉलेज मध्ये असतानाच त्याला जबरदस्त अ‍ॅटक येवून नियतिने आपला डाव साधला या घटनेमुळे या कुटुंबावर जणू आभाळच कोसळले. घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण परिसर गहिवरुन एकवटला.
यवतमाळवरुन हितेशचा मृतदेह आल्यानंतर आई व बहिणीनी फोडलेल्या हंबरड्यामुळे सारा परिसर कसा स्तब्ध झाला. प्रत्येकाच्या डोळयातून अश्रुच्या धारा वाट मोकळी करीत होत्या.
परिसरातील मंडळीनीच हितेशच्या अंत्यसंस्काराची तयारी करुन हजारो चाहत्यांनी त्याला अखेरचा निरोप दिला. उज्वल भवितव्याची स्वप्ने रंगविणारा तरुण मुलगा गेला. लग्नाच्या ंउंबरठ्यावर असणारी मुलगी, मृत्यु शय्येवर असणारा पती अश्या अवस्थेत हितेशच्या आईची करुणावस्था पाहून सारेच गहिवरले .
कुटुंबाला मदतीचा हात द्या
लोकप्रतिनिधी, शासन यांनी या कुटुंबाला शासकीय, वैयक्तिक स्तरावर मदतीचा हात द्यावा, कुटुंबातील महत्वाचा आधार सोडून गेल्याने मृत्यू शय्येवर असलेल्या वडीलांवर आता मोठे संकट आले आहे. त्यामुळे मदत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Destroy the father of a father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.