मजुरांच्या मानसिकतेचे कापसावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:04 PM2018-01-02T23:04:45+5:302018-01-02T23:05:05+5:30

यंदा कापसाचे उत्पादन चांगले होईल, अशी स्थिती सप्टेंबर महिन्यापर्यंत होतीे; पण बोंडअळीने कापूस उत्पादनावर परिणाम झाला. कापूस चिकट व हलका आहे, अशी कारणे पूढे करीत मजूर दररोज वेचणीचे भाव वाढवित आहे.

Crisis on labor intensive cotton workers | मजुरांच्या मानसिकतेचे कापसावर संकट

मजुरांच्या मानसिकतेचे कापसावर संकट

Next
ठळक मुद्देदररोज वाढविले जातात भाव : एक क्विंटल कापूस विकल्यानंतर मजुरी कापून मिळते अर्धीच रक्कम

फणिंद्र रघाटाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : यंदा कापसाचे उत्पादन चांगले होईल, अशी स्थिती सप्टेंबर महिन्यापर्यंत होतीे; पण बोंडअळीने कापूस उत्पादनावर परिणाम झाला. कापूस चिकट व हलका आहे, अशी कारणे पूढे करीत मजूर दररोज वेचणीचे भाव वाढवित आहे. यामुळे कापूस उत्पादक आर्थिक चिंतेत आहे.
आर्थिक निकड भागविण्यासाठी आधीच कापूस विकलेले शेतकरी भाववाढीमुळे कपाळावर हात मारून घेत आहे. शेतकºयांच्या श्रमशक्तीवर गब्बर होण्याची संधी मिळाल्याने खासगी व्यापारी आनंदी आहे. यंदा भरपूर पाऊस येईल, हा हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला. विदर्भात सरासरीच्या निम्मे पाऊस झाला. विशिष्ट दिवसांनी नियमित पाऊस आल्याने पिकाची चांगली वाढ झाली. यंदा कापसाचे उत्पन्न समाधानकारक होईल, अशी अपेक्षा होती; पण दिवाळीच्या पर्वावर विदर्भात ढगाळी वातावरण व हलक्या पावसामुळे कपाशीचे बुड, बोंडे सडून एकरी २-३ क्विंटलचा फटका बसला. बोंडे परिपक्व होऊन फुटण्याऐवजी दोन कळ्या चांगल्या तर दोन किडग्रस्त फुटत होत्या. शेतकºयांनी हिरवी बोंडे फोडून पाहिली असता प्रत्येक बोंडात शेंदरी बोंडअळी दिसून आली. बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार नाही, हा कंपनीचा दावा खोटा ठरवित विदर्भातील कापूस बोंडअळीने फस्त केला. यामुळे अनेकांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरिवला.
काहींनी कापूस वेचण्याचा प्रयत्न केला; पण मजूर १२० रुपये मन प्रमाणे वेचणीस आले. एक दिवस कापूस वेचल्यानंतर मजुरांनी कापूस चिकट आहे, बरोबर निघत नाही व हलका आहे, ही कारणे पूढे करून १५० रुपये भाव द्याल तर उद्या येतो वा येणार नाही, अशी तंबी देणे सुरू केले. शेतकºयांना पर्याय नसल्याने मजुरांना मागेल ती मजुुरी द्यावी लागली. हा कापूस घरी येताच शेतकºयांनी ३५०० ते ४००० रुपयांत खासगी व्यापाºयांना विकला. आता दुसरी व अंतिम वेचणी सुरू आहे. यासाठी मजूर मिळणे कठीण झाले. मजुरांसाठी शेतकरी भटकत आहे; पण मजूर मिळत नाही. कापूस शेतात वाळत आहे. उपलब्ध मजूर २०० रुपये रोज मागत आहे. पूर्वी पायी जाणाºया मजुरांना आता एक किमी अंतरासाठीही वाहनाची व्यवस्था करावी लागते. पूर्वी दलालाशिवाय मजूर येत होते. आता ठेकेदाराशिवाय मजूर मिळत नाही. कामाशिवाय ठेकेदार दररोज शेतकºयांना लुटत आहे. मजूर दररोज भाव वाढविण्याची धमकी देत आहे. मजुरांची चणचण, वेचणीचे न परवडणारे दर व कापसाच्या वजनघटीने शेतकरी त्रस्त आहे. मजुरांची ही मानसिकता शेतकºयांना शेतीपासून परावृत्त करीत आहे. दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून असल्याने मजुरांनी शेतकºयांप्रती सकारात्मक मानसिकता ठेवणे गरजेचे झाले आहे.
वाहन, ठेकेदाराविना मजूर नाही
मजुरीशिवाय दहा मजूर आणण्याचे गाडी भाडे ७०० रुपये व प्रती मजूर २० रुपये ठेकेदाराला हे सर्व पकडून प्रारंभीची कापूस वेचणी प्रती क्विंटल १००० ते १२०० रुपये पडली. आता मजुरांनी दर वाढवित २०० रुपये मागत आहे. यामुळे कापूस वेचणे परवडत नसल्याचे दिसते.

Web Title: Crisis on labor intensive cotton workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस