केंद्र सरकार रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:00 PM2018-07-17T22:00:37+5:302018-07-17T22:00:50+5:30

केंद्र सरकार रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याकरिता कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. वर्धा रेल्वे स्थानकावर वाय-फाय व पुरुष व महिला प्रसाधन गृहाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी पार पडला यावेळी ते बोलत होते.

 The central government will provide better services to the railway passengers | केंद्र सरकार रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा देणार

केंद्र सरकार रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा देणार

Next
ठळक मुद्देरामदास तडस : रेल्वे स्थानकावर वायफाय सेवा व पुरुष, महिला प्रसाधन गृहाचा लोकार्पण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्र सरकार रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याकरिता कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. वर्धा रेल्वे स्थानकावर वाय-फाय व पुरुष व महिला प्रसाधन गृहाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी पार पडला यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वर्धा नगरपरिषदेचे अध्यक्ष अतुल तराळे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून डी.सी.एम. अजय डेनीअल, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, वर्धा लोकसभेचे विस्तारक जयंत कावळे, भाजप शहर अध्यक्ष प्रशांत बुरले, डी.आर.यू.सी.सी.सदस्य रेणुका कोंटबकर, मदनसिंग चावरे, स्टेशन प्रबंधक डी.एस. ठाकूर उपस्थित होते.
यावेळी खा. तडस म्हणाले की, भारतीय रेल्वेने मोठी झेप घेऊन प्रवाशांना अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. विविध ठिकाणी पादचारी पूल, बुकिंग कार्यालय, वायफाय सेवा, अशा अनेक अत्याधुनिक सेवा सुविधा प्रवाशांना देऊन रेल्वेने आधुनिकतेकडे वाटचाल सुरु केली आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात अनेक स्थानकावर रेल्वे थांबे मंजूर झालेले आहे. अनेक रेल्वे विकासकामे पूर्ण झाले असून काही कामे प्रगतीपथावर आहे. वर्धा रेल्वे स्थानक हे जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र म्हणून विकसीत होणार असल्यामुळे याठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. वर्धा व सेवाग्राम स्थानकावर लांब पल्यांच्या गाड्यांचे थांबा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वर्धा येथील रेल्वेस्थानकावर मंगळवारी वाय-फाय सेवा कार्यान्वित करण्यात आली, पुरुष व महिला प्रसाधन गृहाचे लोकार्पण खासदार रामदास तडस यांच्या हस्ते झाले.
यावेळी वर्धा नगरपरिषदेचे अध्यक्ष अतुल तराळे, डी.आर.यू.सी.सी.सदस्य रेणुका कोटबकर, मदनसिंग चावरे यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.सी.एम. अजय डेनीअल यांनी केले, संचालन रेल्वेचे दैने यांनी केले तर आभार स्टेशन प्रबंधक डी.एस. ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाकरिता मार्केटिंग व सेल्स इन्स्पेक्टर मनीष नागले, रेल्वे सेक्शन मनेजर पुनवटकर, जि.प.सदस्य पंकज सायंकार, न.प.सभापती शेख, नगरसेवक निलेश किटे, नगरसेविका श्रेया देशमुख, माजी सभापती मिलिंद भेंडे, भाजयुमो अध्यक्ष अंकुश ठाकूर, पवन परीयाल, सुरेश पट्टेवर, श्रीधर देशमुख, सुनील चावरे, कोलते उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने रेल्वे प्रवाशी उपस्थित होते. त्यांच्याशी खासदारांनी चर्चा केली.
खासदार निधीतून लागणार बेंच
सन २०१८-१९ च्या खासदार स्थानिक विकास निधीतून यावर्षी वर्धा, सेवाग्राम, हिंगणघाट, पुलगाव, सिंदी रेल्वे, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, वरुड या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना बसण्याकरिता बेंचेस देण्यात आलेले आहे. वर्धा येथून रोज प्रवास करणारे पासधारकांच्या ज्या समस्या आहे त्या सोडविण्याकरिता आपण प्रयत्न करणार आहो, असे खा.तडस यांनी सांगितले.

Web Title:  The central government will provide better services to the railway passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.