भरधाव कार अचानक पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:17 PM2019-04-22T21:17:40+5:302019-04-22T21:18:02+5:30

नागपूरवरून वर्धेकडे जात असलेल्या भरधाव कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास केळझर येथे घडली. सतर्क नागरिकांनी कार पेटल्याचे वाहन चालकाच्या वेळीच लक्षात आणून दिल्याने कार मधील तिघांचे प्राण बचावले. मात्र या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले आहे.

The car was raging | भरधाव कार अचानक पेटली

भरधाव कार अचानक पेटली

Next
ठळक मुद्देसतर्क नागरिकांमुळे वाचले तिघांचे प्राण

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : नागपूरवरून वर्धेकडे जात असलेल्या भरधाव कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास केळझर येथे घडली. सतर्क नागरिकांनी कार पेटल्याचे वाहन चालकाच्या वेळीच लक्षात आणून दिल्याने कार मधील तिघांचे प्राण बचावले. मात्र या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले आहे.
केळझरच्या बसस्थानकाजवळ येताच एम.एच. ३१ डी.सी. ६७७७ क्रमांकाच्या कारने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात येताच दक्ष नागरिकांनी ओरडा ओरड करून घटनेची माहिती कारमधील प्रवाशांना दिली. त्यानंतर वाहन चालकाने वाहन थांबले. दरम्यान तातडीने कारमधील तिघांना नागरिकांनी वाहनाबाहेर काढले. शिवाय मिळेल तेथून पाणी उपलब्ध करून आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या कारमध्ये वर्धेचे भांदककर यांच्यासह त्यांचे दोन सहकारी होते. ही कार वीरेंद्र उर्फ राणा रणनवरे यांच्या मालकीची असल्याचे भांदककर यांनी सांगितले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दीपक राऊत व त्यांच्या कुटुंबियांनी मोलाचे सहकार्य केले.

Web Title: The car was raging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.