ब्रिटिशकालीन तलावाचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:29 PM2019-05-17T22:29:58+5:302019-05-17T22:30:21+5:30

जाम हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र ७ वर असून गाव दळणवळणाचे मुख्य ठिकाण आहे. औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या गावात मार्चपासून पाणीटंचाईची चाहूल लागते. पूर्वजांनी करून ठेवलेल्या पाण्याच्या नियोजनाकडे ८० च्या दशकापासून लोकप्रतिनिधी व शासनाने कायमस्वरूपी दुर्लक्ष केले.

British pond survival threat | ब्रिटिशकालीन तलावाचे अस्तित्व धोक्यात

ब्रिटिशकालीन तलावाचे अस्तित्व धोक्यात

Next
ठळक मुद्देलोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ‘गाळयुक्त’च : पाण्यासाठी नागरिकांची दाहीदिशा भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : जाम हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र ७ वर असून गाव दळणवळणाचे मुख्य ठिकाण आहे. औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या गावात मार्चपासून पाणीटंचाईची चाहूल लागते. पूर्वजांनी करून ठेवलेल्या पाण्याच्या नियोजनाकडे ८० च्या दशकापासून लोकप्रतिनिधी व शासनाने कायमस्वरूपी दुर्लक्ष केले. १९३० च्या कार्यकाळात ब्रिटिशाचे सम्राज्य असताना त्या काळातील इंग्रज शासकांनी दहा एकराच्या परिसरात गाव तलावाची निर्मिती केली होती. आज या गावतलावात पाण्याची लहान डबकी दिसून येतात.
या गावतलावात साचलेला गाळ उपसण्याची कोणत्याही प्रशासनाने आजतागायत तसदी घेतलेली नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी विराजमान झालेले सचिन गावंडे यांनी या तलावातील गाळ काढण्याबाबत मुख्यमंत्री, आमदारांसह प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. या गावात जीवन प्राधिकरणाची मांडगाव व जाम अशी संयुक्त नळयोजना आहे. शेडगाव येथील वणा नदीवरून जाम येथे जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला जात असून या जलवाहिनीला दिवसागणिक मोठ्या प्रमाणावर गळती लागलेली दिसून येते.
परिणामी कित्येकांना अल्प पाणीपुरवठा होतो. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्याकरिता टॅकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. शासनाने तालुका टॅकरमुक्त घोषित केल्याने प्रशासकीय मंजुरी मिळणे कठीण झाले आहे. प्रशासनाने तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्याची मागणी होत आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रशासनाकडून गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार अशी घोषणा केली असली तरी तालुक्यातील अनेक गावांतील तलाव अद्याप गाळमुक्त झालेले नाहीत. शेतकरी गाळापासून वंचित राहिले. तर शिवाय गाळयुक्तच आहे. याचा परिणाम म्हणून तलावात ठणठणाट पाहायला मिळत आहे.

पाणीटंचाईसाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक गावातील दुष्काळाबाबत संरपंचाशी संवाद साधला. मी जाम ग्रामवासीयांच्या व्यथा सांगण्यासाठी संबंधितांशी संपर्क केला; मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लेखी स्वरूपाचे निवेदन मुंख्यमंत्र्यांना पाठविले. या निवेदनातून पाणीटंचाई आणि गावातील परिस्थितीविषयी जाणीव करून दिली आहे.
- सचिन गावंडे, सरपंच (जाम).

Web Title: British pond survival threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.