शासन आदेश डावलून बोंडअळीचे अनुदान कर्जखात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:37 AM2018-06-20T00:37:43+5:302018-06-20T00:37:43+5:30

येथील बँक आॅफ इंडिया शाखेने शासनाचे आदेश डावलून बोंडअळीचे अनुदान कर्जखात्यात वळते केले. याची माहिती शेतकऱ्याने आ. डॉ. पंकज भोयर यांना दिली.

Borrowing Grants in Government Dept. | शासन आदेश डावलून बोंडअळीचे अनुदान कर्जखात्यात

शासन आदेश डावलून बोंडअळीचे अनुदान कर्जखात्यात

Next
ठळक मुद्देबँक आॅफ इंडियातील प्रकार : आमदारांकडून व्यवस्थापकाची कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणी : येथील बँक आॅफ इंडिया शाखेने शासनाचे आदेश डावलून बोंडअळीचे अनुदान कर्जखात्यात वळते केले. याची माहिती शेतकऱ्याने आ. डॉ. पंकज भोयर यांना दिली. यावर मंगळवारी आमदारांनी हिंगणी गाठत या बँक व्यवस्थापकाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी हा प्रकार उघड करणाºया बोरी येथील शेतकºयांचीही उपस्थिती होती.
८ जून रोजी जिल्हाधिकाºयांनी सर्व बँक व्यवस्थापकांची बैठक घेतली. या बैठकीला आमदारांचीही उपस्थिती होती. यावेळी शेतकºयांना पीक कर्ज देताना ना हरकत प्रमाणपत्र मागू नये, शासनाने दिलेल्या अनुदानाची कपात कर्ज खात्यात करू नये, कर्जमाफी झालेल्या शेतकºयांना त्वरीत कर्जाचे वितरण करावे तसेच शेतकºयांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशा सूचना केल्या होत्या. असे असताना येथील बँक आॅफ इंडियाच्या व्यवस्थापकाने या सूचनांचे उल्लंघण केल्याचे समोर आले.
बोरी येथील शेतकरी नेताजी कोकाटे व बबनराव सातोकर यांच्या बँक खात्यात बोंडअळीचे अनुदान जमा झाली. ही रक्कम काढून बी-बियाणे आणण्याचा त्यांचा मानस होता. जमा रक्कम काढण्याकरिता शेतकरी बँकेत गेले असता त्यांनी तुमची जमा झालेली रक्कम मदतनिधी खात्यात जमा करण्यात आली, असे सांगण्यात आले. तेव्हा कोेकाटे यांनी आमदार आणि जिल्हाधिकाºयांना व्यवस्थापकांना दिलेले माहिती व्यवस्थापकाला दिली. तरीही व्यवस्थापक ऐकून घेण्यास तयार नव्हते. शेवटी आ.डॉ. पंकज भोयर यांना बँकेच्या व्यवस्थापकांनी शेतकºयांचे बोंडअळीचे अनुदान कर्जामध्ये कपात केल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर बँकेच्या व्यवस्थापकाने शेतकºयांकडून त्यांनी असे लिहून घेतल्याचा प्रकार उघड झाला. या सर्व प्रकारामुळे बँक व्यवस्थापकाला आमदारांनी चांगलेच धारेवर धरले.
यावेळी अशोक मुडे, विलास वरटकर, सुधाकर नाईक, अरूण कौरती, आशिष कांबळे, शकील शेख, दत्तू तडस, रफीक शेख, रवी खडगी, तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थिती होती.
खासगी कर्जाची बँक व्यवस्थापकाला चिंता
सेलू तालुक्यातील हिंगणी बँक आॅफ इंडिया शाखेंतर्गत महिला शेतकºयाने शेती कामासाठी कर्ज घेतले होते. या महिलेला छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत कर्जमाफीचा लाभ मिळणे आवश्यक होते. मात्र या महिलेच्या पतीने फायनान्स कंपनीकडून आॅटो खरेदीसाठी कर्ज घेतले. त्यामुळे हिंगणी येथील शाखा व्यवस्थापकाने शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ महिला शेतकºयाला दिला नाही. अशी माहिती आ. डॉ. पंकज भोयर यांच्या भेटी दरम्यान उघडकीस आली. फायनान्स कंपनीच्या कर्जाची शेतकºयापेक्षा अधिक चिंता करणाºया या व्यवस्थापकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी नागरिकांनी आमदारांकडे केली.

Web Title: Borrowing Grants in Government Dept.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.