वर्धेत अ‍ॅडव्हेंचर पार्क व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:12 PM2018-11-12T23:12:41+5:302018-11-12T23:13:01+5:30

शहरात अ‍ॅडव्हेंचर पार्क व आपत्ती व्यस्थापन केंद्र असावे या विचाराला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मुर्त रुप दिले असून यासाठी आयटीआय टेकडी परिसराची निवड केली आहे.

Adventure Park and Disaster Management Training Center in Warded | वर्धेत अ‍ॅडव्हेंचर पार्क व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र

वर्धेत अ‍ॅडव्हेंचर पार्क व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र

Next
ठळक मुद्देशैलेश नवाल : आयटीआय टेकडीवर होणार साकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात अ‍ॅडव्हेंचर पार्क व आपत्ती व्यस्थापन केंद्र असावे या विचाराला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मुर्त रुप दिले असून यासाठी आयटीआय टेकडी परिसराची निवड केली आहे.
ज्या टेकडीकडे कुणीही नजरही टाकत नव्हते त्या टेकडीचा दिवसेदिवस विकास होत गेल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्या टेकडीची निवड केली आहे. तसेच स्वयंसेवी संस्थांना वृक्षारोपण, संवर्धन व सौदर्यीकरण करण्याची जबाबदारी सोपविली. याला जोड म्हणून साहसी मनोवृत्तीला प्रोत्साहन देण्याकरिता अडथळा पार प्रशिक्षणाचे बेसेस, रॉक क्लाईबिंग, रॅपेलिंग व पॅरासेलिंग सारख्या खेळाच्या सोयी निर्माण केल्या जात आहे. मुला-मुलींच्या व सुजान नागरिकांच्या साहसीवृत्तीस प्रोत्साहन द्यावे, म्हणून जिल्हाधिकारी नवाल यांनी अ‍ॅडव्हेंचर पार्क व आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याची संकल्पना मांडली. त्यांनी सरकारी व स्वयंसेवी संस्थापुढे आवाहन केले असता वर्धेच्या प्रहार समाज जागृती संस्थेने ते स्विकारुन जिल्हाधिकारी यांच्या स्वप्नातील प्रशिक्षण केंद्र साकारण्याचे काम मागील दोन महिन्यापासून सुरु आहे. प्रहार संस्थेचे अध्यक्ष मोहन गुजरकर, सचिव संतोष तुरक, प्रा. रविंद्र गुजरकर यांच्या नेतृत्वात प्रहारचे स्वयंसेवक अ‍ॅडव्हेंचर पार्क व आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारीत आहे. या केंद्राचे उद्घाटन २२ नोव्हेंबरला होणार आहे. यानिमित्ताने बालकांसाठी एक दिवसीय तर तरुणांसाठी पाच दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर केंद्र महाराष्ट्रातील एकमेव केंद्र ठरणार असून येणाºया दिवसांमध्ये इच्छुकांना नागरी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळणार आहे. टेकडीवर खड्डा करणे, अडथळा पार प्रशिक्षणाचे बेसेस उभारणे व साहस खेळासाठी कृत्रीम रॉक क्लाईबींग तयार करण्याचे काम अत्यंत कठीण असल्याने अनेकांनी नाकारले. पण प्रहार संस्थेने पुढाकार घेत कामालाही सुरुवात केली आहे.

Web Title: Adventure Park and Disaster Management Training Center in Warded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.