आदर्शनगरवासींची घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 09:13 PM2019-04-27T21:13:38+5:302019-04-27T21:14:07+5:30

आदर्शनगर येथील रहिवासी पाणीसमस्येचा सामना करीत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आश्वासनापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी शनिवारी रिकाम्या घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत आवारात धरणे दिले.

Adarshnagar residents lost their lives and joined the Gram Panchayat office | आदर्शनगरवासींची घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक

आदर्शनगरवासींची घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक

Next
ठळक मुद्देदिले धरणे, टंचाईवर तोडगा काढण्याची मागणी । तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : आदर्शनगर येथील रहिवासी पाणीसमस्येचा सामना करीत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आश्वासनापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी शनिवारी रिकाम्या घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत आवारात धरणे दिले. सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देत पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला.
दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच आदर्श नगरवासीयांना पाणी समस्येचा सामना करावा लागतो. आश्वासन आणि थातूरमातूर उपाययोजना करून बोळवणूक करण्यात येते. ग्रामपंचायत कार्यालयात याबाबत चौकशी केली तर उलटसुलट उत्तरे दिली जातात. इतकी वर्षे लोटूनही ग्रा.पं. प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. पाणी समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येइल असा इशारा रहिवाशांनी दिला.
शनिवारी ग्रामपंचायतीची मासिक सभा सुरू असताना संतप्त नागरिकांनी धडक दिली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य मुरलीधर कुमरे व अर्चना कांबळे, विमल बोरकर, गीता गावंडे, रिना पाटील, वंदना खंडारकर, शुभांगी परचाके, नमिता ताकसांडे, शोभा वाघमारे, निर्मला मानकर, पंकज भुजाडे, शंकर ताकसांडे, राहुल पंधरे, आदेश कांबळे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

अगोदरच पाणी समस्येने रहिवासी त्रस्त झाले असून ग्रा.पं.प्रशासन खोटे आश्वासन देऊन दिशाभूल करीत आहे.दरवर्षीच पाण्याची समस्या उभी ठाकते. मात्र, ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. रहिवाशांनी त्रासच सहन करायचा का? पाणीसमस्येवर लवकर तोडगा काढण्यात यावा.
-रोशन तेलंग,रहिवासी आदर्शनगर.

आदर्शनगरात पाणीटंचाई आहे. उपाययोजनेबाबतचा ठराव घेण्यात आला असून सोमवारी जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल. टँकरने पाणीपुरवठा किंवा अन्य ठिकाणाहून उपाययोजना करावी याकरिता जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.
-रोशना जामलेकर, सरपंच सेवाग्राम.

पथदिव्यांचे देयक जि.प.भरत होते. ते त्यांनी भरण्यास नकार दिला. आता देयक थकीत आहे. वीज वितरण कंपनीला प्राकलन पाठविले; पण त्यांनीसुद्धा ते मान्य केले नाही. ज्या विहिरीतून पाणी देण्याचे ठरले होते, तेथे वीजजोडणी नसल्याने आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी काम करायला तयार नसल्याने तो प्रस्ताव बारगळला.
- संजय जवादे, सदस्य आदर्शनगर.

Web Title: Adarshnagar residents lost their lives and joined the Gram Panchayat office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.