३,७०० रूग्णांनी घेतला टेलीमेडिसीनचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:26 PM2017-10-18T23:26:22+5:302017-10-18T23:26:33+5:30

जिल्हा सामान्य रूग्णालयात २००९ पासून टेली मेडिसीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सप्टेंबर २०१७ पर्यंत ३७०० रूग्णांनी या यंत्रणेच्याद्वारे उपचाराचा लाभ घेतला आहे.

3,700 patients take advantage of telemedicine | ३,७०० रूग्णांनी घेतला टेलीमेडिसीनचा लाभ

३,७०० रूग्णांनी घेतला टेलीमेडिसीनचा लाभ

Next
ठळक मुद्देकारागृहातील २५ कैद्यांना मार्गदर्शन : जिल्हा सामान्य रूग्णालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा सामान्य रूग्णालयात २००९ पासून टेली मेडिसीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सप्टेंबर २०१७ पर्यंत ३७०० रूग्णांनी या यंत्रणेच्याद्वारे उपचाराचा लाभ घेतला आहे. या यंत्रणेमुळे देश व जगातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा मार्गदर्शन रूग्णांच्या उपचारासाठी लाभत आहे.
विडीओ कॉन्फरन्सद्वारे पेशंट नोड करून तज्ज्ञ डॉक्टर रोग्यावर निदान करतात. व तज्ज्ञांचा सल्लाही घेतला जातो. पुणे, मुंबई येथे जावून अनेक रूग्णांना उपचार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे शासनाने जिल्हा सामान्य रूग्णालयात टेली मेडिसीन यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून कुठल्याही रोगाच्या रूग्णाला तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेता येते. त्यामुळे या सेवेचा वर्धा जिल्ह्यातील रूग्णांना मोठा फायदा होत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात टेली मेडिसीन यंत्रणेचे काम चालविले जात असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
कैद्यांसाठी विशेष व्यवस्था
दर शुक्रवारी जिल्हा सामान्य रूग्णालयातून वर्धा जिल्हा कारागृहातील कैद्यांना टेली मेडिसीनच्या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या आजाराची माहिती घेवून त्यावर उपचार व रोग निदान संदर्भात मार्गदर्शन करण्यात येते. आतापर्यंत २५ रूग्णांना या सेवेचा लाभ देण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात टेली मेडिसीन यंत्रणेचे फॅसिलीटी कर्मचारी आकाश खोपडे येथे काम करीत आहेत. रूग्णांना टेली मेडिसीनद्वारे मार्गदर्शन करण्यात येत असल्यामुळे कारागृह प्रशासनाला रूग्णांला आता रूग्णालयात आणण्याची गरज राहिली नाही.

Web Title: 3,700 patients take advantage of telemedicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.