पिण्यासाठी २७ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 09:23 PM2018-12-08T21:23:42+5:302018-12-08T21:24:53+5:30

जल हे जीवन आहे, असे सांगितले जात. असे असले तरी यंदाच्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने सध्या हिवाळ्यातच नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये सध्या पिण्यासाठी केवळ २७ टक्केच जलसाठा उपलब्ध असून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर न केल्यास भविष्यात नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.

27 percent water supply for drinking | पिण्यासाठी २७ टक्केच जलसाठा

पिण्यासाठी २७ टक्केच जलसाठा

Next

सावधान : पाण्याचा काटकसरीने वापर न केल्यास भीषण जलसंकट
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जल हे जीवन आहे, असे सांगितले जात. असे असले तरी यंदाच्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने सध्या हिवाळ्यातच नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये सध्या पिण्यासाठी केवळ २७ टक्केच जलसाठा उपलब्ध असून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर न केल्यास भविष्यात नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.
यंदाच्या वर्षी अल्प पावसामुळे जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प वगळता उर्वरित दहा जलाशय केवळ ४० टक्केच भरले. परतीचा पाऊस जोरदार बरसेल व वर्धा जिल्ह्यावरील जलसंकटाची छाया हटेल अशी आशा असताना परतीच्या पावसाने यंदा जिल्ह्याकडे पाठच फिरविली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने भविष्यातील जलसंकट लक्षात घेवून तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात जलयुक्ती शिवार, गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत मागील दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसंवर्धनाचे कामे झाली आहेत. परंतु, पावसाळ्याच्या दिवसात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने यंदा वर्धेकरांवर जलसंकट ओढावले आहे. वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जलसमस्यवर मात करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु, ढगाळी वातावरण असतानाही जलाशयांमधील पाण्याचे होणारे बाष्पीभवन तसेच विविध प्रकारचे लॉसेस यामुळे मे आणि जून महिन्यात नागरिकांना पाणी समस्येला नागरिकांना चांगलेच तोंड द्यावे लागणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
सुकळी प्रकल्पातील पाण्याने भागविली जातेय वर्धेकरांची तहान
धाम प्रकल्पातील सोडलेल्या पाण्याची उचल करून ते पिण्यायोग्य करून त्याचा पुरवठा वर्धा शहरासह परिसरातील गावांना केल्या जातो. परंतु, सध्यास्थितीत धाम प्रकल्पात केवळ १७ टक्केच पाणी आहे. त्यामुळे त्या पाण्याचे योग्य नियोजन केले जात आहे. वर्धेकरांची तहान भागविण्यासाठी सध्या सुकळी प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. शुक्रवारपासून सुकळी प्रकल्पातून राखीव असलेले पाणी सोडण्यास सुरूवात झाली असून ते केवळ डिसेंबर अखेरपर्यंतच पुरेल असा अंदाज वर्तविला जात आहे.
सिंचनासाठीचा कोटा संपला
यंदाच्या वर्षी उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना पाटबंधारे विभागाने शेतकºयांचा विचार करून सिंचनासाठी दोन पाळीत जलाशयांमधील पाणी सोडण्याचे निश्चित केले होते. आतापर्यंत सिंचनासाठी दोन वेळा जलाशयांमधील पाणी सोडण्यात आले असून पिण्यासाठीच अल्प पाणी उपलब्ध असल्याने यापूढे सिंचनासाठी पाणी देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी पाटबंधारे विभागाने हिवाळ्याच्या सुरूवातीलाच शेतकऱ्यांना कमी पाणी लागणारी रब्बी पीक घेण्याचे आवाहन केले होते.
जनावरांसाठी पाणी राखीव
पिण्यासाठी जलाशयातील पाणी सोडल्यानंतर होणारे बाष्पीभवन, वहन, शेतीसाठी पाण्याची होणारी पाण्याची उचल आदी लॉसेसचा फटका पाटबंधारे विभागाला सहन करावा लागतो. यंदाच्या मे व जून महिन्यात भीषण जलसंकटालाच नागरिकांना तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून जनावरांसाठी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे.
सध्या ३ ते ४ एम.एम. बाष्पीभवन
जर एखादी स्थानिक स्वराज्य संस्था ९ द.ल.घ.मी. पाण्याची उचल करीत असेल तर त्यासाठी जलाशयामधून सुमारे १८ द.ल.घ.मी. पाणी सोडावे लागते. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये केवळ २७ टक्के पाणीसाठा असून प्रत्येक दिवसाला सुमारे ३ ते ४ एम.एम. पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. सध्या जिल्ह्यात ढगाळी वातावरण असल्याने सदर आकडा कमी आहे. परंतु, भविष्यात जिल्ह्याचा पार वाढल्यावर होणाऱ्या बाष्पीभवनाच्या प्रमाणात वाढ होईल, असे सांगण्यात येते.

सध्या जिल्ह्यातील जलाशयांमध्ये २७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतकºयांचा विचार करून आम्ही आतापर्यंत सिंचनासाठी दोन पाळीत जलाशयांमधील पाणी सोडले आहे. भविष्यातील जलसंकट लक्षात घेवून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
- श्याम काळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा.

Web Title: 27 percent water supply for drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.