वन कायद्यान्वये २५२ गुन्ह्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:55 PM2018-11-27T23:55:49+5:302018-11-27T23:59:11+5:30

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही शिकवण विविधतेत एकता असलेली भारतीय संस्कृती प्रत्येकाला शिकवते. परंतु काही जण याच वन संपदेचे नुकसान करीत वन्य प्राण्यांच्या शिकारीही करीत असल्याचे वास्तव आहे.

252 offenses under forest law | वन कायद्यान्वये २५२ गुन्ह्यांची नोंद

वन कायद्यान्वये २५२ गुन्ह्यांची नोंद

Next
ठळक मुद्देअवैध वृक्ष कत्तलीसह शिकारीला आळा : पेट्रोलिंग व्हॅन ठरल्या फायद्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही शिकवण विविधतेत एकता असलेली भारतीय संस्कृती प्रत्येकाला शिकवते. परंतु काही जण याच वन संपदेचे नुकसान करीत वन्य प्राण्यांच्या शिकारीही करीत असल्याचे वास्तव आहे. वन्य प्राण्याची शिकार करणाऱ्यांना धडा शिकविण्यासह वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी सध्या स्थानिक वन विभागाने कंबर कसली आहे. शिवाय वन कायद्यान्वये २५२ गुन्ह्याची नोंद वन विभागाने घेतली आहे.
जिल्ह्यात वर्धा, समुद्रपूर, हिंगणी, कारंजा (घा.), तळेगाव, आष्टी, आर्वी व खरांगणा हे वन परिक्षेत्र आहेत. याच परिसरात अवैध वृक्षतोड, वन्य प्राण्यांची शिकार, वन जमिनीवर अतिक्रमण, वन जमिनीवर होणारे अवैध उत्खनन, प्रतिबंधित क्षेत्रात चराई, वन वनवा आदींना आळा घालण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून सध्या विशेष प्रयत्न केले जात आहेत. वरिष्ठांच्या सुचनेवरून प्रतिबंधात्मक ठरणारे काम करताना काही चूकीचे होत असल्याचे निदर्शनात आल्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वन कायद्यान्वये २५२ गुन्ह्यांची नोंद घेतली आहे.
कुठली अनुचित घटना घडू नये म्हणून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी गस्त घालतात. गस्तीसाठी काही चमूही तयार करण्यात आल्या आहेत. ती चमू सक्रिय राहत असल्याने पूर्वीच्या तुलनेत अवैध वृक्ष कत्तल आणि वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या प्रकाराला आळा बसल्याचे दिसून येते. गस्तीसाठी तयार करण्यात आलेल्या चमूतील अधिकाऱ्यांकडून वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी माहिती जाणून घेतात. तसेच वरिष्ठ अधिकारी योग्य सूचनाही त्यांना करीत असल्याचे वन विभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले.

आठ गस्त तर दोन विशेष पथक
वन विभागाच्यावतीने जिल्ह्यातील आठही वन परिक्षेत्र कार्यालयात गस्तीपथक तयार करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर तळेगाव आणि जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा येथे विशेष भरारी पथक तयार करण्यात आले आहे. अनुचित प्रकाराची माहिती मिळताच ही पथक तात्काळ घटनास्थळ गाठत असल्याने तसेच सदर पथकातील अधिकारी व कर्मचाºयांकडून सध्या वनसंपदा संवर्धनाचा उद्देश जोपासल्या जात असल्याने ही पथके फायद्याचीच ठरत आहेत.

जिल्ह्यातील वन संपदा व वन्य प्राण्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही काम करीत आहो. आमच्या कामाला नागरिकांचेही सहकार्य मिळत आहे. जिल्ह्यात कुठेही वन कायद्याचे उल्लंघन होत असल्यास त्याची माहिती नागरिकांनी थेट वन विभागाच्या अधिकाºयांना द्यावी. तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.
- सुहास बढेकर, सहाय्यक, वनसंरक्षक, वर्धा.

५९ प्रकरणे न्यायप्रविष्ट
वन कायद्यान्वये दाखल गुन्ह्यापैकी १५४ गुन्हे न्यायदानासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी ५९ प्रकरणे न्यायालयात न्यायप्रविष्ट असून ३९ प्रकरणे सक्षम अधिकारी स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. तर ५६ प्रकरणे चौकशीत आहेत.

९८ प्रकरणांचा निपटारा
वन कायद्यान्वे एकूण दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणांपैकी ९८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. निपटारा करण्यात आलेले ही प्रकरणे न्यायालयीन आणि विभागीय स्तरावरील असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 252 offenses under forest law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.