संपामुळे २२५ कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 09:43 PM2017-08-22T21:43:59+5:302017-08-22T21:46:22+5:30

विविध मागण्यांच्या पुर्ततेकरिता बँकेच्या कर्मचाºयांनी मंगळवारी देशभर एक दिवसीय कामबंद आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील ११८ बँकेच्या कर्मचाºयांनी या सहभागात नोंदविला.

225 crore turnover jumped due to the strike | संपामुळे २२५ कोटींची उलाढाल ठप्प

संपामुळे २२५ कोटींची उलाढाल ठप्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विविध मागण्यांच्या पुर्ततेकरिता बँकेच्या कर्मचाºयांनी मंगळवारी देशभर एक दिवसीय कामबंद आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील ११८ बँकेच्या कर्मचाºयांनी या सहभागात नोंदविला. या संपामुळे सुमारे २२५ कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले.
जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचाºयांच्या मागण्यांवर विचार न झाल्यास बँक कर्मचारी संपावर जाऊन शासनाच्या बँक कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध करेल असा इशारा देण्यात आला होता. या इशाºयानंतरही बँक प्रशासनाकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे हा संप पुकारण्यात आला. बँकेकडून अतिरिक्त वाढविण्यात आलेले दर रद्द करण्यात यावे. वसुलीकरिता असलेली सुधारीत नियमावली लागू करण्यात यावी. एफआरडीआय विधेयक रद्द करण्यात यावे आदी मागण्यांसाठी आज हे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या सर्व ११८ बँक शाखेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या संपामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
गणेशोत्सवाच्या खरेदीवर विरजण
पोळ्याचा सण आज असून दोन दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. या सणाकरिता नागरिकांना खरेदी करायची असल्याने त्यांनी बॅँकेत धाव घेतली; मात्र बॅँकेच्या संपामुळे या कर्मचाºयांना एटीएमचाच आधार घ्यावा लागला. येथेही नो कॅश च्या फलकाने नागरिकांची तारांबळ उडाली.

Web Title: 225 crore turnover jumped due to the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.