१० गावात होते रात्रभर जागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:17 AM2017-09-24T00:17:51+5:302017-09-24T00:18:07+5:30

वाघीण येईल आणि हल्ला करेल, या भीतीपोटी जंगलव्याप्त असलेल्या दहा गावातील नागरिकांच्या डोळ्यातील झोप बेपत्ता झाली आहे.

10 In the village there were waking up overnight | १० गावात होते रात्रभर जागली

१० गावात होते रात्रभर जागली

Next
ठळक मुद्देवाघिणीची दहशत : गावकरी भयभीत; प्रशासनही आले घायकुतीस

अमोल सोटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : वाघीण येईल आणि हल्ला करेल, या भीतीपोटी जंगलव्याप्त असलेल्या दहा गावातील नागरिकांच्या डोळ्यातील झोप बेपत्ता झाली आहे. हातात लाठ्या आणि टेंभे घेवून गावकरी गटागटात विभाजित होवून जागली करीत आहे. वाघिणीच्या भीतीपोटी शेताकडे दुर्लक्ष झाल्याने तोंडचा घास जाण्याचीही भीती गावकºयांकडून वर्तविली जात आहे. वाघिणीच्या दहशीतीत असलेल्या या १० गावांत गत तीन दिवसांपासून गावकरी पहरेदार झाले आहेत.
वडाळा, पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, सत्तरपूर, टुमणी, बोरगाव, धाडी, येनाडा, पिलापूर ही गाव घनदाट जंगलाच्या कुशीत आहे. गावाच्या सभोवताल जंगल, शेती असा भाग टप्प्याटप्प्यांनी व्यापला आहे. या नरभक्षक वाघिणीच्या गळयाला कॉलर आयडी असताना वनविभागाला ती सापडू नये यावर गावकरी संतप्त आहे.
भिवाजी हरले यांचा बळी गेल्यावर इतर शेतकरी यांचा भिवाजी होवू नये अशी अपेक्षा गावकºयांची आहे. शंभरावर ताफा जंगलात दोन दिवसांपासून कोम्बींग आॅपरेशन करीत आहे. कॉलर आयडीवरुन १ किमी टप्पा सहज वेढा घातला येतो; पण लोकेशन परफेक्ट मिळत नसल्याने कॉलर आयडी वाघिणीच्या गळ्यातून गायब झाल्याचा आरोप होत आहे.
वडाळा, पोरगव्हाण, पंचाळा गावातील नागरिक प्रचंड दहशतीत आहे. शेताकडे दुर्लक्ष झाल्याने कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी, भुईमुग पिकांना हानी पोहचली आहे. मात्र वाघिण येईल हल्ला करील, जीव जाईल या भीतीने गावातील कुणीही शेतकरी शेतात जाणार नाही असे सांगितले. रात्रभर लाठ्या-काठ्या घेवून रॉकेलचे टेंभे लावून सजग पहारा दिल्या जात आहे.

वीज वितरणकडूनही चटके
वीज वितरण कंपनीची सेवा कोलमडल्याने वीजपुरवठा दिवसभर व रात्री ११ पर्यंत खंडित असल्याने अंधाराच्या साम्राज्याने काहूर माजविला आहे. दुरुस्तीचे काम धिम्या गतीने सुरू आहे. शेतातील विहिरीवरील पाण्याच्या मोटर, स्टार्टर, वायर चोरीला जात आहे. जीव गमावून काय करायचे असे म्हणज शेतकरी हतबल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी गावकºयांना धीर देणे सुरू केले आहे.

Web Title: 10 In the village there were waking up overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.