सोशल मिडियावरील अति उत्साहामुळे तुमचं घर होऊ शकतं साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 04:17 PM2017-10-07T16:17:59+5:302017-10-07T16:18:42+5:30

पिकनिकला जाताना फोटोपासून ते आपलं लोकेशन जाहीर करण्यापर्यंत काही गोष्टींवर लावा लगाम

enthusiasm of social media can 'empty' your house | सोशल मिडियावरील अति उत्साहामुळे तुमचं घर होऊ शकतं साफ

सोशल मिडियावरील अति उत्साहामुळे तुमचं घर होऊ शकतं साफ

Next
ठळक मुद्देप्रवासाला गेल्यानंतर आपल्या सगळ्याच गोष्टी सोशल मिडियावर लगेच शेअर करू नका.अनेक भामटे अशाच माहितीच्या शोधात असतात. आपण बाहेरगावी आहोत म्हटल्यांवर त्यांच्यासाठी मग आयताच चान्स..थोडा धीर धरा आणि पिकनिकहून आल्यानंतर मग ते फोटो, तिथलं प्रवासवर्णन शेअर करा. आम्ही आता घरी परतलो आहोत याचा उल्लेख करायला मात्र विसरू नका.

- मयूर पठाडे

आपण प्रवासाला जातो. खूप उत्साह असतो आपल्याला. फोटो तर किती काढू आणि किती नको असं आपल्याला होतं. बरं काढले, तर काढले, ते केव्हा एकदा सोशल मिडियावर टाकून सगळ्यांना शेअर करतो असं आपल्याला होतं. अख्ख्या फॅमिलीचे फोटो आपण शेअर करतो. फोटो फारच छान असतात. कारण लगेच आपल्या परिचितांकडून त्याची दादही आपल्याला मिळते. आपणही मग हा फोटो कुठला, कोणत्या ठिकाणी काढलेला.. तिथलं वातावरण.. कशी मज्जा आली, येतेय.. याचं रसभरीत वर्णन आपण तिथे करतो. आत्ता आपण कुठे आहेत ही अ‍ॅडिशनल माहिती देखील पुरवतो. उत्साह आणखीच दांडगा असेल, तर अजून किती दिवस आम्ही सहकुटुंब सहलीला आहोत, हेदेखील कळवून टाकतो..
आता इतकी सारी माहिती तिही इत्यंभूतपणे हातात ‘तयार’ मिळाल्यावर मग आणखी काय पाहिजे?..
अनेक भामटे अशाच माहितीच्या शोधात असतात. आपण बाहेरगावी आहोत म्हटल्यांवर त्यांच्यासाठी मग आयताच चान्स..
दिवाळीच्या काळात आणि सुटीच्या दिवसांत, घरी कोणी नसताना अख्खं घर साफ करून नेल्याच्या अनेक घटना दरवर्षी प्रत्येक ठिकाणी घडतात. त्यामुळे तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर अवश्य जा, पण आपली अशी बित्तम्बातमी सोशला मिडियावर चुकूनही शेअर करू नका. समजा तुम्हाला ही माहिती, तुमचे इतके उत्तम फोटो आपल्या परिचितांबरोबर शेअर करायचेच असतील, तर थोडा धीर धरा आणि पिकनिकहून आल्यानंतर मग हे फोटो शेअर करा. आम्ही आता घरी परतलो आहोत याचा उल्लेख करायला मात्र विसरू नका. या प्रवासाचं रसभरीत वर्णनही आता तुम्ही करू शकता. पण हे सारं आपल्या उत्साहाला थोडा आवर घालून केलं तर नंतर पस्तावण्याची वेळ येणार नाही.

Web Title: enthusiasm of social media can 'empty' your house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.