ठळक मुद्देज्या वेळी आपण प्रवासाला जाणार आहोत, त्यावेळचं वातावरण कसं आहे ते अगोदर पाहा.प्रवासाची आपली यादीच तयार हवी.उदाहरणार्थ, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, फूड, पर्सनल केअर, अत्यावश्यक गोष्टी.. त्या त्या मुद्यापुढे फक्त पॉर्इंटरमध्ये आपल्याला जे जे सोबत घ्यायचं आहे ते लिहित जायचं.

- मयूर पठाडे

प्रवासाला जाण्याचा आपला अनुभव कसा आहे?.. म्हणजे आपण सारेच जण कुठल्या ना कुठल्या कारणानं प्रवास करतो. कधी तो पिकनिक म्हणून आपल्या कुटुंबासोबत केलेला असतो, कधी आॅफिसच्या काही महत्त्वाच्या कामासाठी केलेला असतो किंवा लग्न, सण, समारंभ.. यासाठी केलेला प्रवास.. काहीही असो.. आणि कितीही आधी ते आपल्याला माहीत असो, या प्रवासाची तयारी आपण कधी सुरू करतो?..
बहुतांश अनुभव असा आहे, आपला प्रवास कितीही प्रिप्लान्ड असला, तरीही प्रवासाची बॅग भरण्याची तयारी मात्र आपण बºयाचदा अगदी ऐनवेळी करतो.. काही जणांना तर आता निघायचंय, पण तरीही ते आपली बॅग भरतच असतात. हे राहिलं, ते राहिलं.. शेवटी अगदीच नाइलाज झाल्यावर जे काही भरलं असेल बॅगमध्ये, ते घेऊन निघतात...
खरं तर प्रवासाला जाताना अशी ऐनवेळची धांदल टाळता येणं सहज शक्य आहे.. त्यासाठी काही गोष्टी मात्र मनापासून करायला हव्यात. त्यासाठी फार वेळ लागत नाही, पण ऐनवेळची गडबड मात्र त्यामुळे टळेल.
ऐनवेळची गडबड टाळण्यासाठी काय कराल?
१- सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेळी आपण प्रवासाला जाणार आहोत, त्यावेळचं वातावरण कसं आहे ते पाहाणं..
२- म्हणजे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा.. त्यानुसार आवश्यक त्या गोष्टी सोबत घेणं.
३- आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवासाची आपली यादीच तयार हवी.
४- ही यादीही विशिष्ट क्रमानं असावी. उदाहरणार्थ, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, फूड, पर्सनल केअर, अत्यावश्यक गोष्टी.. अशा प्रकारे. मग त्या त्या मुद्यापुढे फक्त पॉर्इंटरमध्ये आपल्याला जे जे सोबत घ्यायचं आहे ते लिहित जायचं.
४- खरं तर ही लिस्ट कायमस्वरुपीही तयार करून ठेवता येईल. ज्या ज्या वेळी प्रवासाला जायचं असेल, त्यावेळी फक्त ही लिस्ट बघायची आणि त्याप्रमाणे आपलं सामानं सोबत घ्यायचं.
बघा, अगदी ऐनवेळी जरी तुम्हाला कुठे जायचं असलं तरी ही लिस्ट अगदी देवदुताप्रमाणे कामाला येईल.