ठाण्यात दिव्यांग मुलांच्या कलाविष्काराने रंगला यंदाचा बालमहोत्सव, सिन्गल शाळेतील मुलांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 04:47 PM2018-01-13T16:47:56+5:302018-01-13T16:51:56+5:30

This year's Balamohotsav, painted by the artwork of Divyang children, has sent messages of environmental conservation to children of Singal school | ठाण्यात दिव्यांग मुलांच्या कलाविष्काराने रंगला यंदाचा बालमहोत्सव, सिन्गल शाळेतील मुलांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ठाण्यात दिव्यांग मुलांच्या कलाविष्काराने रंगला यंदाचा बालमहोत्सव, सिन्गल शाळेतील मुलांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Next
ठळक मुद्देयंदाचा सहावा बालमहोत्सव शनिवारी गडकरी रंगायतनमध्ये रंगलादिव्यांग आणि सिग्नल शाळेतील मुलांचा विशेष सहभागसागर कारंडे यांनी साधला मनमोकळे पणाने संवाद

ठाणे: दिव्यांग आणि सिग्नल शाळेतील मुलांचा विशेष सहभाग, त्यांचा आणि सर्वसामान्य मुलांचा कलाविष्कार, चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेची उपस्थिती आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाने यंदाचा सहावा बालमहोत्सव शनिवारी गडकरी रंगायतनमध्ये रंगला. यावेळी स्नेहालय संस्थेच्या संचालिका आॅलिव्हिया डिसुझा यांना फिनिक्स पुरस्काराने गौरविण्यात आले.
           प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी, ठाणे आयोजित हा महोत्सव सकाळपासून आयोजित करण्यात आला होता. सुलोचनादेवी सिंघानिया शाळेचे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संतवाणी या सांगितीक कार्यक्र माने या महोत्सवाची सुरूवात झाली. या कार्यक्रमातून संतपरंपरा उलगडण्याचा प्रयत्न बालवारकºयांकडून केला गेला. या बालमहोत्सवात यंदा प्रथमच दिव्यांग तसेच विशेष मुलांचे कलाविष्कार सादर झाले. या दिव्यांग मुलांच्या जिद्दीचा हा अनोखा प्रवास पाहण्याची संधी बालप्रेक्षकांसह मोठ्यांनाही यानिमित्ताने अनुभविण्यास मिळाली. यावेळी लहान मुलांसाठी काम करणाºया व्यक्तींचा गौरव करण्यात आला. प्रारंभ कला अकॅडमीचे विद्यार्थी ‘जाईच्या कळ््या’ हे डोंबाºयांचा जीवनपट उलगडणारे नाटक देखील यावेळी सादर झाले. सिग्नल शाळा, स्नेहालय या संस्थांचे बालकलाकारही मंचावर विविध कलाविष्कार सादर केले. व्हॅर्न्टोलॉजिस्ट सुचित्रा इंदुलकर यांच्या पपेट शोने मुलांना पोट धरुन हसविले. त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील बाल रु ग्णांसह मंचावर आगळावेगळा प्रयोग सादर केला. उपस्थितांशी सागर कारंडे यांनी मनमोकळे पणाने संवाद साधला. विशेष मुलांना उद्देशून ते म्हणाले की, आज खुप दिवसांनी माणसात आल्यासारखे वाटत आहे. बाहेरच्या जगातील माणसं ही आपल्याला अ‍ॅबनॉर्मल म्हणतात. पण या अ‍ॅबनॉर्मलाचा तुम्ही अभिमान बाळगा कारण तुम्ही त्यांच्यासारखे वाईट नाही. तुमच्या पद्धतीने जगा अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. यावेळी पितांबरीचे सीईओ अजय जोशी, सिंघानिया स्कूलच्या मुख्याध्यापिका रेवती श्रीनिवासन, उद्योजक समीर नातू, रामभाऊ म्हाळगी समितीचे सदस्य सुजय पत्की, तन्वी हर्बल्सच्या डॉ. मेधा मेहेंदळे, डॉ. मीना व राजारामपुर गोसावी उपस्थित होते. यावेळी प्रारंभ कला अ‍ॅकॅडमीच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी प्रास्ताविक केले.
 

Web Title: This year's Balamohotsav, painted by the artwork of Divyang children, has sent messages of environmental conservation to children of Singal school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.