पतीच्याच हत्येच्या आरोपातून पत्नी निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:45 PM2018-11-29T23:45:10+5:302018-11-29T23:45:18+5:30

पुरावे मिळालेले नाहीत : ठाणे न्यायालयाचा निकाल

Wife innocent to husbands murder charges | पतीच्याच हत्येच्या आरोपातून पत्नी निर्दोष

पतीच्याच हत्येच्या आरोपातून पत्नी निर्दोष

Next

ठाणे : गळा आवळून पतीच्याच हत्येचा आरोप असलेल्या पत्नीची ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोस पुरावे सरकारी पक्ष सादर करू न शकल्याने निर्दोष मुक्तता केली. हा निकाल बुधवारी ठाणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश वीरेंद्र बिष्ट यांनी दिला.


मुंब्य्राच्या आलमास कॉलनी येथे पती मोहम्मद मेहंदी सय्यद व त्याची पत्नी जेहरा राहत होते. २ मे २०१७ रोजी मोहम्मद याच्या काकाने मुंब्रा पोलीस ठाण्यात त्यांचा पुतण्या मोहम्मद मेहंदी हा मृतावस्थेत सापडल्याची तक्रार नोंदवली. तसेच त्याचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत नेल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार, तातडीने धाव घेऊन मुंब्रा पोलिसांनी स्मशानात जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सरकारी रु ग्णालयात पाठवला. यावेळी, शवविच्छेदन अहवालात मृतकाचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यावर मुंब्रा पोलिसांनी घरातून गायब झालेली मयताची पत्नी जेहरा हिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. त्यानंतर, या हत्येचे प्रकरण न्यायाधीश वीरेंद्र बिष्ट यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणी आल्यावर सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना तपासात निष्पन्न झालेला प्रकार विशद केला. यात आरोपी पत्नी जेहरा हिने ओढणीने पतीची गळा आवळून हत्या केली.


भांडणाचा तक्रारीमध्ये उल्लेखच नाही
गुन्ह्यात वापरलेली ओढणी कचरापेटीत टाकल्याचा युक्तिवाद केला. तसेच, मोहम्मद याचे काका, आई आणि भाऊ यांचीही साक्ष नोंदवली. सादर केलेले पुरावे पुरेसे नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्या दोघांमध्ये उद्भवणाऱ्या भांडणाचा तक्र ारीत कुठे उल्लेख नसल्याने हत्या करण्यामागचा उद्देश स्पष्ट होत नाही. त्यामुळे जेहरा हिची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल दिला.

Web Title: Wife innocent to husbands murder charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.