केडीएमसीच्या लोकप्रतिनिधींची पावले थिरकतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 04:50 AM2018-10-02T04:50:36+5:302018-10-02T04:50:57+5:30

अत्रे रंगमंदिराचा पुनर्लोकार्पण सोहळा : ‘तू गं दुर्गा तू भवानी’ या गीतावर नृत्य सादर, कर्मचाऱ्यांच्या सादरीकरणालाही दाद

 When the KDMC public representatives dance performance | केडीएमसीच्या लोकप्रतिनिधींची पावले थिरकतात तेव्हा...

केडीएमसीच्या लोकप्रतिनिधींची पावले थिरकतात तेव्हा...

googlenewsNext

कल्याण : केडीएमसीचा पस्तिसावा वर्धापन दिन रंगला तो महापालिका कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारामुळे. नगरसेविकांनी अंबामातेच्या गीतावर केलेले नृत्य लक्षवेधी ठरले, तर महापालिकेतील कर्मचाºयांनी विविध सांस्कृतिक कार्यक्र म सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

महापालिकेचा ३५ वा वर्धापन दिन आणि जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आचार्य अत्रे रंगमंदिराचे पुनर्लोकार्पण महापौर विनीता राणे यांच्या हस्ते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यानिमित्ताने महापालिका कर्मचाºयांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी गणेशवंदना, कथ्थक तसेच शेतकरी, आदिवासी, राजस्थानी, कोळी नृत्यांनी रसिकांची वाहवा मिळवली. या कर्मचाºयांच्या पाठोपाठ नगरसेविका आशालता बाबर, शालिनी वायले, हर्षाली थवील, सुनीता खंडागळे, शीतल मंडारी, भारती कुमरे यांनी ‘तू गं दुर्गा तू भवानी’ या गीतावर नृत्य सादर करत ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले. या त्यांच्या नृत्याला भरभरून दाद मिळाली. वाहनचालक प्रकाश वाघ यांनी केलेले सादरीकरणही लक्षवेधी ठरले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रेय लधवा आणि प्रसाद दाणी यांनी केले.
माजी सचिवांचा विशेष सत्कार
२००१ मध्ये अत्रे रंगमंदिराच्या शुभारंभप्रसंगी सादर झालेल्या ‘रायगडाला जेव्हा जाग’ या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे कलावंत व केडीएमसीचे माजी सचिव चंद्रकांत माने आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेतील कलावंत कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांचा यावेळी शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

उत्तम सुविधांसाठी प्रयत्नशील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्मार्ट सिटीच्या योजनेत राहण्यायोग्य शहरांमध्ये देशातील पहिल्या १०० शहरांत कल्याण-डोंबिवलीचा पन्नासावा, तर महाराष्ट्रात दहावा क्र मांक आला, हे प्रशंसनीय आहे. कल्याण स्थानक परिसर स्वच्छ व सुंदर करून तेथील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत विविध प्रकल्प हाती घेतले आहेत, अशी माहिती देताना नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी त्यांना उत्तम नागरी सुविधा देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली.

देखभालीची कामे एनजीओंना द्यावीत
शहरांचा विकास साधताना तेथील भौगोलिक व सांस्कृतिक बाजूंचा अभ्यास करून विकास साधावयास पाहिजे. कल्याण-डोंबिवली शहरांनी ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवला महापालिका क्षेत्राचा विकास साधण्यासाठी आवश्यक तेवढा निधी वेळीच उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन सभापती राहुल दामले यांनी दिले. अत्रे रंगमंदिर आणि अन्य वास्तूंची देखभाल करण्याची कामे एनजीओ यांना द्यावीत, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

समन्वयातून विकासकामे करा
च्नागरिकांना उत्तम प्रकारच्या नागरी सुविधा मिळण्यासाठी प्रशासन आणि शासन या दोन्ही घटकांनी समन्वय साधून एकत्रितरीत्या विकासकामे करावीत, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. विकासकामांना चालना देण्यासाठी पीपीपीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली. ते पुढे म्हणाले की, रंगमंदिराचे नूतनीकरण केल्याने त्याला नवसंजीवनी मिळून नवी झळाळी मिळाली आहे.

च्याबद्दल त्यांनी प्रशासन, कंत्राटदार, पत्रकार, नगरसेवक व पदाधिकाºयांना धन्यवाद दिले. माझा राजकीय प्रवास याच रंगमंदिरापासून झाला. माझे खासदारकीचे तिकीट याच ठिकाणी घोषित झाले, त्यावेळी मी माझे पहिले भाषण इथेच केले. आज माझ्याच हातून पुनर्लोकार्पण होत आहे, ही अभिमानाची आणि योगायोगाची बाब असल्याचे शिंदे म्हणाले.

हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या आचार्य अत्रे रंगमंदिराचे पुनर्लोकार्पण माझ्या हातून होत असल्याने हा माझ्या दृष्टीने भाग्याचा क्षण आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजते, अशा शब्दांत महापौर विनीता राणे यांनी भावना व्यक्त केल्या. सांस्कृतिक क्षेत्रात रंगभूमीला अनन्यसाधारण महत्त्व असून नाट्यकलाकार व नाट्यरसिकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. याचबरोबर नागरिकांना उत्तम मूलभूत सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे अभिवचन त्यांनी याप्रसंगी दिले.

Web Title:  When the KDMC public representatives dance performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.