उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By अजित मांडके | Published: January 13, 2024 02:06 PM2024-01-13T14:06:28+5:302024-01-13T14:07:09+5:30

उद्धव ठाकरे यांनी  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. ते आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात.

Uddhav Thackeray paid tribute to Balasaheb Thackeray's views says Chief Minister Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : उद्धव ठाकरे यांनी  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. ते आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात. अशी थेट टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यात केली. शुक्रवारी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिर परिसराची साफसफाई केली. त्याच पार्शवभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील प्राचीन कोपीनेश्वर मंदिर परिसराची साफसफाई केली. यावेळी ते बोलत होते.

 आज आम्ही जी डीप क्लीन मोहीम सुरु केली आहे. त्याने ठाण्यातील प्रदूषण कमी झाले आहे. असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले या डीप क्लीन मोहिमेत समाजातील सर्व घटक  सहभागी होतात. यातून आम्हाला एक लोक चळवळ निर्माण करायची आहे. असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या स्वच्छ भारत मोहिमेतून याची प्रेरणा घेतली. स्वच्छ भारत अभियानाला जसा प्रतिसाद मिळत आहे. तसाच प्रतिसाद महाराष्ट्र मध्ये मिळतो. याने  प्रदूषण कमी होण्यास खूप परिणाम झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्याण दोराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता.

लोकशाहीत दौरा करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी शिंदे वर घराणेशाहीचा आरोप केला आहे. त्याबाबत विचारले असता. उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीची व्याख्या सांगावी. जे स्वतःचे  कुटुंब एकत्र ठेवू शकले नाहीत. ज्यांनी  केवळ माझे कुटुंब माझी जवाबदारी  पहिली. ते यावर बोलत आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरे  यांनी  शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. ते आपल्या सहकार्यना घरगडी समजतात.असे ही मुख्यमंत्री म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांचे  यांचे राममंदिर उभारण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. उद्धव ठाकरे यांचे राममंदिराचे प्रेम बेगडी आहे.

हेच म्हणायचे मंदिर वही बनायेंगे तारीख नहीं बतायेंगे. पण मोदींनी मंदिर पण तयार केले आणि तारीख पण जाहीर केली. असा टोला ही शिंदे यांनी लगावला.राम मंदिर हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. तो राजकीय विषय होऊ शकत नाही. तसेच मोदी यांनी काळाराम मंदिर स्वच्छ केले तसेच मंदिरे स्वच्छ करण्याचे आवाहन केले, त्यानुसार राज्यातील मंदिर स्वच्छ करणे परिसर स्वच्छ केले जातील असेही ते म्हणाले.

Web Title: Uddhav Thackeray paid tribute to Balasaheb Thackeray's views says Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.