ठाणे परिवहनच्या भंगार बसेसमध्ये टॉयलेट फॉर हर, अ‍ॅम्ब्युलन्स आॅन मोटर सायकल, आयुक्तांचे महत्वपूर्ण निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 03:06 PM2017-12-09T15:06:19+5:302017-12-09T15:09:34+5:30

ठाणे परिवहन सेवेच्या भंगार बसेस आता महापालिका आयुक्तांनी उपयोगात आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार या भंगार बसेसमध्ये महिलांसाठी टॉयलेट सेवा सुरु करण्याचा निर्णय अधिकारी परिषदेत घेण्यात आला.

Toilet for harbor buses, toilet for har, ambulance and motor cycle, important decisions of commissioner | ठाणे परिवहनच्या भंगार बसेसमध्ये टॉयलेट फॉर हर, अ‍ॅम्ब्युलन्स आॅन मोटर सायकल, आयुक्तांचे महत्वपूर्ण निर्णय

महापालिका अधिकारी परिषदेच्या दुस-या दिवशी मार्गदर्शन करताना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल. सोबत अतिरिक्त आयुक्त(१) सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त(२) समीर उन्हाळे.

Next
ठळक मुद्देआपत्तीच्या काळात अ‍ॅम्ब्युलन्स आॅन मोटरसायकलपरिवहनच्या भंगार बसेस येणार वापरात

ठाणे - ठाणे महानगरपालिका अधिकारी परिषदेच्या आजच्या दुसऱ्या  दिवशी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे परिवहन सेवेच्या भंगार बसेस ‘टॉयलेट फॉर हर’ या नावाने महिला प्रसाधनगृहासाठी वापरण्याचा तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्राथमिक उपचार सुविधेसह ‘अ‍ॅम्ब्युलन्स आॅन मोटर सायकल’ सुरू करण्याचे महत्वाचे दोन निर्णय घेतले.
ठाणे महानगरपालिकेच्या माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्र येथे शुक्रवारपासून दोन दिवसीय महापालिका अधिकारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी वरील दोन महत्वाचे निर्णय घेतले. यावेळी अतिरिक्त आयुक्त(१) सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त(२) समीर उन्हाळे व इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.
ठाणे परिवहन सेवेकडे सद्यस्थितीमध्ये अनेक बसेस भंगार अवस्थेत पडून आहेत. या भंगार बसेस ‘टॉयलेट फॉर हर’ महिला प्रसाधनगृहासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. जाहिरातीच्या अधिकाराच्या मोबदल्यात या भंगार बसेसचे टॉयलेटमध्ये रूपातंरीत करून ती टॉयलेट शहराच्या विविध भागामध्ये ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. त्याचबरोबर बसेसमधील प्रसाधनगृहाची निगा व देखभाल, स्वच्छता यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.
त्याचबरोबर अपघात किंवा आग दुर्घटनामधील जखमींना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी प्राथमिक उपचार सुविधेसह दुचाकी आपत्कालीन रूग्णवाहिका सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला. जवळपास ३० दुचाकी आपत्कालीन रूग्णवाहिका सुरू करण्याचा प्रस्ताव जयस्वाल यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान परिषदेच्या आजच्या दुसºया दिवशी घनकचरा व्यवस्थापन, अतिक्र मण निर्मूलन, शहर विकास या विभांगानी सादरीकरण केले.


 

Web Title: Toilet for harbor buses, toilet for har, ambulance and motor cycle, important decisions of commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.