तीन महिन्यांत २0१४ जणांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:58 PM2018-12-11T23:58:59+5:302018-12-11T23:59:19+5:30

अकरा महिन्यात ३ हजार ९०३ जणांना श्वानदंश

In the three months 2014 the swine flu | तीन महिन्यांत २0१४ जणांना श्वानदंश

तीन महिन्यांत २0१४ जणांना श्वानदंश

Next

ठाणे:भटक्या श्वानांची दहशत काय असते, हे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. या वर्षातील अकरा महिन्यांत तीन हजार ९०३ जणांनी श्वानदंशावर उपचार घेतले असून त्यामध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत तब्बल दोन हजार १४ जणांना श्वानदंश झाल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील शहरी भागाप्रमाणे आता ग्रामीण भागातही झपाट्याने नागरीकीकरण होत आहे. जिल्ह्याच्या या वाढत्या विस्ताराबरोबरच जागोजागी निर्माण होणाऱ्या घाणीच्या व कचºयाच्या साम्राज्यामुळे तसेच चायनीज गाड्यांमुळे भटक्या कुत्र्यांची समस्या शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील वाढू लागली आहे. हे श्वान मोटारसायकलने ये- जा करणाºयांचा पाठलाग करणे, लोकांच्या अंगावर न भुंकणे, लोकांचे लचके तोडणे यासारख्या घटना दिवसेंदिवस वाढ आहेत. नुकतेच उल्हासनगर येथे एकाच वेळी सात मुलांना भटक्या श्वानांनी चावे घेतले होते. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ येणाºया रुग्णांची माहिती घेतली असता, ही धक्कादायक बाब पुढे आली. मागील चार वर्षांत सुमारे १२ हजार जणांना श्वानदंश झाला आहे. २०१५ मध्ये दोन हजार ५६९ जण उपचारार्थ दाखल झाले होते, तर २०१६ मध्ये २,१९६ जण उपचारार्थ आले होते. २०१७ मध्ये हा आकडा थेट १ हजार १०० वर पोहोचला. श्वानदंश झाल्यानंतर त्यावर देण्यात येणार इंजेक्शन अथवा व्हॅक्सीनचा साठा सहा महिने पुरेल इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पालघर जिल्ह्यात श्वानदंश झालेले रु ग्णही उपचारसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात येतात. त्यामुळे जिल्हा रु ग्णालयावरील ताण मात्र जिल्हा विभाजनानंतरही कमी झाल्याचे अजून दिसत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चिंतेचा विषय : श्वानदंशाच्या वाढत्या घटना हा चिंतेचा विषय झाला आहे. २०१८ च्या जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यात ३ हजार ९०३ नागरिकांना भटक्या श्वानांनी चावे घेतले. ही आकडेवारी या प्रकाराचे गांभीर्य स्पष्ट करते.

श्वानदंशाबाबत शासकीय रु ग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. येथे उपचारार्थ येणाºयांवर तातडीने उपचार केले जातात.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक,
जिल्हा सामान्य रु ग्णालय ठाणे

आकडेवारी
महिना           श्वानदंश
जानेवारी          ३०६
फेब्रुवारी          २६७
मार्च                २४७
एप्रिल              २७५
मे                    २१६
जून                 २३९
जुलै                 १७१
ऑगस्ट            १६८
सप्टेंबर             ३९६
ऑक्टोबर        ६९६
नोव्हेंबर           ९२२
डिसेंबर            ०००
एकूण             ३९०३

Web Title: In the three months 2014 the swine flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.