सप्तरंगात न्हाऊन आली!, सर्वत्र दिवाळीचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 06:18 AM2017-10-20T06:18:32+5:302017-10-20T06:18:41+5:30

संध्याकाळी मुहूर्तावेळी धमूधडाक्यात साजरे झालेले लक्ष्मीपूजन आणि दिवसभर सहकुटुंब सुरू असलेली खरेदी यामुळे ठाणे जिल्ह्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह, चैतन्य जाणवत होते.

 There was a siege!, The enthusiasm of Diwali everywhere | सप्तरंगात न्हाऊन आली!, सर्वत्र दिवाळीचा उत्साह

सप्तरंगात न्हाऊन आली!, सर्वत्र दिवाळीचा उत्साह

Next

ठाणे : संध्याकाळी मुहूर्तावेळी धमूधडाक्यात साजरे झालेले लक्ष्मीपूजन आणि दिवसभर सहकुटुंब सुरू असलेली खरेदी यामुळे ठाणे जिल्ह्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह, चैतन्य जाणवत होते. पारंपरिक पद्धतीने होणाºया खरेदीचा ट्रेंड यंदा बदललेला दिसला.
पारंपरिक आकाशकंदिल, चमचमत्या दिव्यांच्या माळा, सुबकतेबरोबरच आकर्षक रंगसंगतीने सजलेल्या रांगोळ््या यामुळे ही दिवाळी बहुरंगी झाल्याचे दिसत होते. दिवाळीनिमित्त होणारी सोन्याची, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची खरेदी यंदा फारशी दिसून आली नाही. त्याऐवजी कपडे, इमिटेशन ज्वेलरी, पादत्राणे, घर सजावटीच्या वस्तू, फुले-पणत्या यांच्या खरेदीचा ट्रेंड भरपूर होता.
खरेदीसोबतच हॉटेलिंगचा ट्रेंड यंदा भरपूर होता. खरेदी झाल्यावर थकली-भागलेली पावले हॉटेलांकडे वळलेली दिसत होती. सहकुटुंब भोजनचा आस्वाद घेणारी कुटुंबे असल्याने या काळात दुपारी आणि संध्याकाळीही हॉटेल गर्दीने तुडुंब भरलेली होती. तेथेही रांगा लावण्याची वेळ आली होती.

रेडीमेड फराळाला पसंती

घरोघरी होणाºया फराळाच्या पदार्थांसोबतच यंदा घरगुती चवीच्या, बचत गटांनी बनवलेल्या, गृहउद्योगांत मिळणाºया फराळाच्या पदार्थांना भरपूर मागणी होती. दिवाळी
पूर्वी आॅर्डर देऊन ज्यांनी फराळाचे बुकींग केले होते त्यांच्यासोबतच आयत्यावेळी पदार्थ खरेदी करणाºयांचा ट्रेंडही दररोज पाहायला मिळत होता. त्यातही भाजणीची कडबोळी, पाकातले चिरोटे, गुळाचे जाळीदार अनारसे अशा पारंपरिक पदार्थांना अधिक मागणी होती.

रांगोळीने टाकली कात
मध्यंतरीच्या काळात भव्य रांगोळीचा ट्रेंड होता. आता मात्र नाजूक, आकर्षक रंगसंगती, साच्यातून काढलेल्या रांगोळ््यांचा ट्रेंड दिसतो आहे. त्यासोबतच एखाद्या विषयाची थीम घेऊन त्यावर काढलेल्या रांगोळ््याही लक्ष वेधून घेत आहेत.

ंमुलांच्या परीक्षा संपल्यानंतर म्हणजेच शुक्रवारनंतरच दिवाळीच्या खरेदीने वेग पकडला. तोवर अनेकांच्या हाती बोनस पडला होता. पगारही झाला होता.

सुती कपड्यांना मागणी
सध्या आर्द्रता प्रचंड वाढल्याने घामाच्या धारांचा पाऊस सर्वजण अनुभवत आहेत. त्यामुळेही असेल कदाचित पण यंदाच्या खरेदीत सुती (कॉटन) कपड्यांना अदिक पसंती दिली गेली. मुलांचे कपडे, साड्या, पुरूषांचे शर्ट यात कॉटनचा ट्रेंड अधिक होता.

मिष्टान्नातही जपली परंपरा
एरव्ही मिष्टान्नात बंगाली मिठाईला किंवा जिलेबीला मिळणाºया पसंतीपेक्षा यंदा पुरणपोळी, सांजापोळी, खव्याची पोळी, बासुंदी, गुलाबजाम, आम्रखंड, उकडीचे मोदक अशा पारंपरिक पदार्थांना अधिक मागणी असल्याचे दिसून आले.
 

Web Title:  There was a siege!, The enthusiasm of Diwali everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :diwaliदिवाळी