मतदान वाढण्यासाठी सर्वच केंद्रे आदर्श करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 01:19 AM2019-05-02T01:19:38+5:302019-05-02T01:19:53+5:30

मतदारांची नावे वगळल्याने नाराजी : विशेष मोहीम राबवण्याची आवश्यकता, बदलापूरमध्ये यंदाही याद्यांमध्ये दिसला घोळ

There is a need to set up all the centers to increase polling | मतदान वाढण्यासाठी सर्वच केंद्रे आदर्श करण्याची गरज

मतदान वाढण्यासाठी सर्वच केंद्रे आदर्श करण्याची गरज

googlenewsNext

अंबरनाथ/बदलापूर : मतदार यादीतील दुबार नावे वगळल्याचा दावा निवडणूक आयोग करित असला, तरी निवडणुकीची टक्केवारी वाढताना दिसत नाही. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोग संकल्प पुढे करित आहेत. विधानसभा क्षेत्रात एखाद दुसरे आदर्श मतदान केंद्र सुरु केले जाते. सखींसाठी खास केंद्र उभारले जाते; मात्र मतदानाची आकडेवारी वाढविण्यासाठी सर्वच मतदान केंद्रे ही आदर्श मतदान केंद्र करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून अनेक नावे वगळल्याने मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले. यासंदर्भात मतदार याद्यांची पूर्ण तपासणी करुन वगळण्यात आलेली नावे पुन्हा यादीत समाविष्ट करण्यासाठी मोहिम हाती घेणे गरजेचे आहे. दुबार नावे वगळताना बीएलओकडून प्रभागात योग्य चाचपणी केली जात नाही. त्यामुळे दुबार नावाचे कारण पुढे करुन अनेकांची नावे वगळली गेली आहेत. यासंदर्भात योग्य कार्यवाही करण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते प्रदिप पाटील यांनी केली आहे. आदर्श मतदान केंद्र आणि सखी मतदान केंद्राची संकल्पना चांगली आहे. मात्र मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वच मतदान केंद्र हे आदर्श केली पाहिजे. एखाद दुसरे मतदान केंद्र आदर्श करुन त्याचा कोणताही फायदा होणार नाही. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सर्व सुविधा देणे बंधनकारक केले पाहिजे.

बदलापुरात नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही मतदारयाद्यांचा घोळ समोर आला आहे. निवडणूक आयोगाने अलीकडेच नवीन ओळखपत्र देऊनही नवतरु ण मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे अनेक जुन्या मतदारांची नावेही यादीतून वगळल्याने मतदारांत संतापाचे वातावरण आहे. या सर्व परिस्थितीला मतदार यादीमधील घोळाला जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषी असणाºयांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी केली आहे. मतदारांसाठी शासकीय चिठ्ठी वाटणे आवश्यक असताना अशा कोणत्याही चिठ्ठी वाटल्या न गेल्याने सकाळी बहुतेक मतदान केंद्रांबाहेर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत होते. नव्या मतदारांना कोणत्याही प्रकारचे ओळखपत्रे, चिठ्ठी वाटण्यात न आल्याचा आरोप करण्यात येत आहे. अगदी अलीकडे नवीन युवकांना मतदार ओळखपत्रे मिळाली असून, अशा नवीन मतदारांची नावेच मतदारयादीत नसल्यामुळे तरूण मतदार मतदान केंद्रावरून माघारी गेले. मतदार यादीमधून नावे वगळण्याबाबत कॅप्टन आशिष दामले यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. स्थलांतरित, मयत अथवा दुबार नावे असलेल्यांची नावे मतदार यादीमधून वगळण्यात येत असतात. मात्र स्थलांतरितांची नावे वगळताना बीएलओकडून कोणतीही शहानिशा केली जात नाही, जुजबी विचारणा करून कुठेही नोटिसा बजावण्यात येत असतात. अशा नोटिसा एखाद्या कचराकुंडीवर अथवा वीज वितरणाच्या ट्रान्स्फार्मरवर चिकटवला गेल्या आहेत. मग अशा नावांची व्यवस्थित चौकशी न करता थेट नावे वगळण्यात आली असल्याचे निदर्शनास आल्याचे कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक महिने मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरु होते. ज्या मतदारांची नावे आहेत, मात्र अशा मतदारांची छायाचित्रे त्या यादीत नाहीत अशा मतदारांची छायाचित्रे गोळा करण्याची मोहीम राज्यभर राबविण्यात आली आहे. मात्र छायाचित्रे गोळा केलेल्या सर्वांची छायाचित्रे जबाबदार अधिकाºयांकडे दिली गेली नसल्याने अनेकांची नावे यादीमधून वगळण्यात आल्याचा आरोपही दामले यांनी केला आहे.

आता बहुतेक कामे ही ऑनलाईन पद्धतीने योग्य पद्धतीने होत आहेत. मतदार याद्याही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आणि मतदारांची आधारकार्डद्वारे लिंक केल्यास दुबार, मयत, स्थलांतरित अशा सर्वांची शहानिशा होऊ शकते. त्यासाठी मानिसकता असणे, आवश्यक असल्याचे दामले यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात निवडणूक आयोगाला तक्रार आणि स्थानिक पातळीवर येणाºया अडणींवर काय तोडगा काढावा यासाठी सूचना करणार आहे.

Web Title: There is a need to set up all the centers to increase polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.