मुंबईतून अपहरण झालेल्या बाळाची नाशिक येथून सुखरुप सुटका: ठाणे पोलिसांनी केली महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 07:51 PM2019-04-15T19:51:18+5:302019-04-15T20:13:20+5:30

लग्नाला दहा वर्ष होऊनही मुलबाळ नसल्याने नाशिकच्या नीलम बोरा या महिलेने मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनल या रेल्वे स्थानकातून एका दोन महिन्यांच्या बाळाची चोरी केली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने या प्रकरणाचा छडा लावून बाळाची तिच्या तावडीतून सुटका केली असून तिला अटक केले आहे.

Thane police rescued the kidnapped infant boy from Nashik: Thane police arrested the woman | मुंबईतून अपहरण झालेल्या बाळाची नाशिक येथून सुखरुप सुटका: ठाणे पोलिसांनी केली महिलेस अटक

सीसीटीव्हीच्या आधारे केला तपास

Next
ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईसीसीटीव्हीच्या आधारे केला तपासमुलबाळ नसल्याने उचलले चोरीचे पाऊल

ठाणे: मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनल या रेल्वे स्थानकातून दोन महिन्यांच्या बाळाचे (मुलाचे) अपहरण करणाऱ्या नीलम संजय बोरा (३४, रा. नाशिक) या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने रविवारी दुपारी अटक केली. तिच्या तावडीतून या बाळाची सुखरुप सुटका केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी सोमवारी दिली.
मुंब्रा येथील सलमान खान या दहा महिन्यांच्या बाळाच्या अपहरणाचा तपास ठाणे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे. ३ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या परिसरातून सलमानचे अपहरण करण्यात आले आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. याच अपहरणाचा तपास मुंब्रा पोलिसांसह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे पथक करीत असतांना मुंब्रा ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (सीएसटी) आणि सीएसटी ते कसारा आणि कर्जत पर्यंतच्या सर्व सीसीटीव्हींची पोलिसांनी पडताळणी केली.
मार्च महिन्याच्या अखेरीस सीएसटी येथून दोन महिन्यांच्या बाळाला उचलून नेणारी एक महिला सीसीटीव्हीत कैद झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सलमानच्या तपासाला यातूनच वेग मिळाला. सलमानला उचलून नेणाºया महिलेची देहयष्टी सीएसटीमधून बाळ चोरणाºया महिलेशी मिळतीजुळती होती. त्यामुळेच ही महिला आणि मुंब्रा येथून सलमानचे अपहरण करणारी महिला एकच असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. त्यानुसार ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाला या महिलेचे सीसीटीव्हीतील छायाचित्र मिळाले. हेच छायाचित्र वेगवेगळया ठिकाणी प्रसिद्ध महिलेची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले. तसेच दादर ते आसनगाव, कल्याण ते कर्जतपर्यंत सुमारे २०० हून अधिक सीसीटीव्हींचीही पडताळणी करुन या महिलेचा कसून शोध घेण्यात आला. या प्रकरणाचा शोध सुरु असतांना संबंधित संशयित महिला रामवाडी, पंचवटी भागातील असल्याचे समोर आले. या माहितीची खातरजाम झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, अविनाश कु-हाडे, पोलीस हवालदार आनंदा भिलारे, सुनिल जाधव, दादा पाटील, विकी कांबळे आणि नीलम वाकचौरे आदींच्या पथकाने १४ एप्रिल रोजी दुपारी २ वा. च्या सुमारास नाशिकमधील पंचवटीतील रामवाडी येथील श्रद्धा पार्क येथून ताब्यात घेतले. तिच्याच ताब्यातून मुंबईतून अपहरण झालेल्या दोन महिन्यांच्या बाळाचीही या पथकाने सुखरुप सुटका केली. नीलम बोरा या महिलेने २९ मार्च २०१९ या बाळाचे सीएसटी येथून अपहरण केल्याची कबूलीही दिली. दहा वर्ष लग्नाला होऊनही स्वत:ला अपत्य नसल्याने आपण या बाळाची चोरी केल्याची कबूलीही तिने तपास पथकाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बाळाला आता देवराज यांनी तिच्या आईच्या ताब्यात दिले आहे. बाळाची प्रकृती सुखरूप असून त्याला सोमवारी आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर अपहरण करणा-या नीलम बोरा या महिलेला पुढील कारवाईसाठी सीएसटी रेल्वे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: Thane police rescued the kidnapped infant boy from Nashik: Thane police arrested the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.