पगारासाठी शिक्षकांची टीजेएसबी ‘शाखेत’ हजेरी

By admin | Published: June 15, 2017 03:03 AM2017-06-15T03:03:36+5:302017-06-15T03:03:36+5:30

नोटाबंदीमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्यातील भाजपा सरकारने घाईघाईने घेतलेल्या एका निर्णयाने धक्का बसला आहे

TAJSB 'attendance at branch' attendance | पगारासाठी शिक्षकांची टीजेएसबी ‘शाखेत’ हजेरी

पगारासाठी शिक्षकांची टीजेएसबी ‘शाखेत’ हजेरी

Next

- नारायण जाधव। लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नोटाबंदीमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्यातील भाजपा सरकारने घाईघाईने घेतलेल्या एका निर्णयाने धक्का बसला आहे. जिल्ह्यातील अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्चस्व असलेल्या ठाणे जनता सहकारी बँके (टीजेएसबी) मार्फत काढण्याचा फतवा जारी केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ जुलै २०१७ पासून होणार असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांना जून महिन्याच्या पगारासाठी टीजेएसबीच्या ‘शाखां’मध्ये हजेरी लावावी लागणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेसह शिक्षक संघटनांना विश्वासात न घेता घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षकवर्गात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून गृहकर्जासह त्यांच्या इतर हप्त्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार असल्याने त्याचे तीव्र पडसाद येत्या काळात उमटण्याची चिन्हे आहेत.
शिक्षण विभागाने १४ जून २०१७ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ठाण्याच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या पगारासाठीचे मेन पूल अकाउंट ठाणे जनता सहकारी बँकेत तत्काळ उघडावे, असे बजावण्यात आले आहे.
शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जिल्हाभरातील १२१८ शाळांमधील १८ हजार २७३ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खाती बंद होऊन त्यात दरमहा जमा होणारी ७० कोटींची उलाढाल थांबणार आहे. या निर्णयाबाबत टीडीसी बँकेला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या बँकेचे प्रशासनही अंधारात आहे.
आता ही बँक खाती ठाणे जनता सहकारी बँकेत उघडली जाणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात बँक खाती अचानक बंद होणार असल्याने आधीच नोटाबंदीने हैराण झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक व्यवस्थापनाची आपला डोलारा सांभाळताना चांगलीच दमछाक होणार आहे.


नोटा बँकेत पडून

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर सुमारे ७६ कोटी ७८ लाख २७ हजार रुपयांच्या जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत पडून आहेत.
त्या स्वीकारण्यास आरबीआयने नकार दिला असला, तरी त्यांच्या व्याजापोटीचा दररोज ८४ हजार २४० रुपये भुर्दंड या बँकेला सहन करावा लागत आहे.
असे असताना आता पुन्हा शिक्षकांच्या पगाराचे व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेऊन शिक्षण खात्याने या बँकेचे कंबरडेच मोडले आहे.

Web Title: TAJSB 'attendance at branch' attendance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.