ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी नव्या ९०० ईव्हीएम मशीनचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 06:55 PM2019-03-02T18:55:16+5:302019-03-02T19:05:18+5:30

लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात सुमारे ६० लाख ९३ हजार ८७ मतदार निश्चित आहेत. त्यांच्या मतदानासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक ईव्हीम मशीनचा पुरवठा सुरू झाला आहे. शनिवारी ठाणे येथील गोडाऊनवर ९०० ईव्हीएम मशिन्सचा पुरवठा झाला आहे. मतदानाच्या उर्वरित ईव्हीएम मशिन लवकरच जिल्हह्यातील गोडाऊनमध्ये उपलग्ध होणार आहे. त्यावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

Supply of new 900 EVM machines for the Lok Sabha elections in Thane district | ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी नव्या ९०० ईव्हीएम मशीनचा पुरवठा

शनिवारी सुमारे ९०० ईव्हीम मशीनचा पुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात सहा हजार ४८८ मतदान केंद्रतीन लोकसभा मतदार संघात ६० लाख ९३ हजार ८७ मतदारतर ३४० तृतीयपंथी मतदार

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात सहा हजार ४८८ मतदान केंद्र आहेत. त्यासाठी पाच हजार १७० बेसिक युनिट्स, आठ हजार ९६१ सेन्ट्रल युनिट, आणि सात हजार ७६१ व्हीव्हीपॅट लागणार आहेत. त्यापैकी शनिवारी सुमारे ९०० ईव्हीम मशीनचा पुरवठा झाला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात सुमारे ६० लाख ९३ हजार ८७ मतदार निश्चित आहेत. त्यांच्या मतदानासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक ईव्हीम मशीनचा पुरवठा सुरू झाला आहे. शनिवारी ठाणे येथील गोडाऊनवर ९०० ईव्हीएम मशिन्सचा पुरवठा झाला आहे. मतदानाच्या उर्वरित ईव्हीएम मशिन लवकरच जिल्हह्यातील गोडाऊनमध्ये उपलग्ध होणार आहे. त्यावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. यामुळे पुढील आठवड्याभरात आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात ठाणेसह कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदार संघात ६० लाख ९३ हजार ८७ मतदार आहेत. यात ३३ लाख २१ हजार ७९० पुरु ष आणि २७ लाख ७० हजार ९५७ महिला तर ३४० तृतीयपंथी मतदार आहेत. त्यांना ईव्हीएम या मतदान यंत्राव्दारे मतदार करावे लागणार आहे. यास अनुसरून नुकताच सुमारे ९०० मतदान यंत्र उपलब्ध झाले आहेत. मतदान केंद्रांवरील या मशिन्स हाताळण्यासह विविध प्रकारच्या कामांसाठी ६१ हजार ९९४ कर्मचाऱ्यांचे नियोजन केले असून त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहेत. यामध्ये २०० व्हीडीओग्राफर्स, ७२ भरारी पथके, ८६७ झोनल अधिकारी व तितकेच उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवणारे अधिकारी या लोकसभेच्या निवडणुकीत तैनात होणार आहेत.

Web Title: Supply of new 900 EVM machines for the Lok Sabha elections in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.