सरकारी गोदामातून २५० क्विंटल भात चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 03:15 AM2018-12-23T03:15:18+5:302018-12-23T03:15:27+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भातावर चोरट्यांनी डल्ला मारून ५०० गोण्या लंपास केल्याची प्राथमिक माहिती महामंडळाच्या कर्मचा-यांनी दिली.

 Stolen 250 quintals of rice from the government godown | सरकारी गोदामातून २५० क्विंटल भात चोरीस

सरकारी गोदामातून २५० क्विंटल भात चोरीस

Next

मुरबाड : आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भातावर चोरट्यांनी डल्ला मारून ५०० गोण्या लंपास केल्याची प्राथमिक माहिती महामंडळाच्या कर्मचाºयांनी दिली.
आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकºयांकडून हमी भावात भात खरेदी केला जातो. मुरबाड तालुक्यात माळ व धसई येथील केंद्रात भात खरेदी केला जातो. महामंडळाचे स्वत:चे गोदाम नसल्याने मिळेल त्या ठिकाणी भातखरेदीचे काटे लावले जातात. माळ केंद्रातील भातखरेदी खापरी येथे केली आहे. चार ते पाच वर्षांपासून खापरी येथे भात साठवला जातो. मागील वर्षी खरेदी केलेला भात यावर्षी उचलण्यात आल्याने रिकाम्या झालेल्या गाळ्यात चालू हंगामातील भात खरेदी करून गाळे बंद केले होते. या ठिकाणी रात्रपाळीसाठी कर्मचारी किंवा रखवालदार नसल्याने ही संधी साधून चोरट्यांनी एका गाळ्याचा दरवाजा तोडून त्यामधील अंदाजे ५०० गोण्या लंपास केल्याचे महामंडळ कर्मचाºयांनी सांगितले.
या भाताचे वजन अंदाजे २५० क्विंटल असून त्याची किंमत चार लाख २५ हजार आहे. याबाबत आदिवासी विकास महामंडळाच्या कर्मचाºयांनी टोकावडे पोलीस ठाण्यात तक्र ार दिली आहे.

Web Title:  Stolen 250 quintals of rice from the government godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे