स्टाइल में रहने का...; ठाण्यातील नेत्यांची कॉटनला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:35 PM2019-04-21T23:35:50+5:302019-04-21T23:37:47+5:30

रंगीबेरंगी कपडे परिधान करण्याचा ट्रेण्ड

Staying in style ...; Thane leaders prefer cotton | स्टाइल में रहने का...; ठाण्यातील नेत्यांची कॉटनला पसंती

स्टाइल में रहने का...; ठाण्यातील नेत्यांची कॉटनला पसंती

Next

- अजित मांडके 

ठाणे : नरेंद्र मोदी यांनी विकास किती केला, याबाबत मतभिन्नता असू शकते. मात्र, मोदींनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक महागडे, रंगीबेरंगी कुर्ते, जॅकेट परिधान करून देशभरातील नेत्यांना ‘स्टाइल में रहने का’, ही शिकवण दिली. ठाण्यातील नेत्यांनी मोदीच नव्हे, तर त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडूनही ड्रेससेन्स परफेक्ट पकडला आहे.

आता मागील काही वर्षांत मीडिया व सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आपण प्रेझेंटेबल असले पाहिजे, याची जाणीव झाल्याने राजकीय मंडळींचा पोशाख बदलला असून रंगीत ब्रॅण्डेड कपड्यांवर नेते अधिक भर देऊ लागले आहेत. पांढरे पोशाख अडगळीत जाऊन नवनवीन उठावदार कपडे राजकीय मंडळींच्या अंगावर दिसू लागले आहेत.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे पांढरा लिननचा शर्ट, पांढरी पॅण्ट अशा पोशाखात असतात. मात्र, त्यांच्या पक्षातील आमदार प्रताप सरनाईक हे आपल्या महागड्या व आकर्षक पेहरावाकरिता ओळखले जातात. सरनाईक पांढरे कपडे परिधान करणे टाळतात. मोदी जॅकेट त्यांनीही आपलेसे केले असून त्यांच्याकडील एकाहून एक सरस हटके जॅकेट ही त्यांची ओळख आहे. सरनाईक व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्यात अनेक बाबतीत स्पर्धा सुरू असते.

मात्र, कपड्यांच्या पसंतीच्या बाबतीतही हे दोघे स्पर्धा करतात. रेडिमेड कपड्यांचीही त्यांना आवड आहे. शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांचा पोशाख तसा साधाच आहे. शर्ट-पॅण्ट आणि त्यावर कधीतरी जॅकेट असा त्यांचा पेहराव असतो. ठाण्यातील स्टोअरमधून ते कपडे शिऊन घेतात.

सरनाईक यांच्या कुठल्याही पोशाखाची किंमत १५ ते २५ हजारांच्या पुढेच असते. ठाणे तसेच मुंबईतील काही खास डिझायनरकडून ते कपडे
शिवून घेतात.
राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे रंगीबेरंगी कपडे घालत असून ठाण्यातील रिच मॅन टेलरकडून तसेच भायखळ्यातील एका प्रतिथयश टेलरकडून ते कपडे शिवून घेतात. त्यांच्याही एका पोशाखाची किंमत १० हजारांपेक्षा जास्त असते.

Web Title: Staying in style ...; Thane leaders prefer cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.