स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम हॅक करून ठाण्यातील तरुणीचा मानसिक छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:42 AM2017-12-07T00:42:52+5:302017-12-07T00:43:05+5:30

‘स्नॅपचॅट’ ‘हॅक’ करून ‘इन्स्टाग्राम’चे बनावट अकाउंट बनवून नौपाड्यातील एका अठरावर्षीय तरुणीला सतत मानसिक त्रास देणा-या दर्श शांतिलाल सत्रा (२१) या तरुणाला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे

Snapechat, torture of thieves by hacking installagram | स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम हॅक करून ठाण्यातील तरुणीचा मानसिक छळ

स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम हॅक करून ठाण्यातील तरुणीचा मानसिक छळ

Next

ठाणे : ‘स्नॅपचॅट’ ‘हॅक’ करून ‘इन्स्टाग्राम’चे बनावट अकाउंट बनवून नौपाड्यातील एका अठरावर्षीय तरुणीला सतत मानसिक त्रास देणा-या दर्श शांतिलाल सत्रा (२१) या तरुणाला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. गेले सहासात महिने चिवटपणे या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी त्याला मंगळवारी रात्री अखेर जेरबंद केले. त्याचा लॅपटॉप आणि दोन मोबाइलही पोलिसांनी जप्त केले आहेत.
नौपाड्यात राहणारी ही तरुणी विलेपार्ले येथील गांधी कॉलेज आॅफ मॅनेजमेंटमध्ये मास मीडियाचे शिक्षण घेत आहे. तिथेच तिच्या ‘स्नॅपचॅट’वर सुरुवातीला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून त्याने तिच्याशी मैत्री केली. ‘तुला मुले आवडतात, तू मुलांचे आयुष्य खराब का करतेस?’ असे म्हणून त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तब्बल सहा महिने त्रास दिल्यानंतर त्याने तिचे ‘स्नॅपचॅट’चे अकाउंटही हॅक केले. या त्रासाला कंटाळून तिने अखेर ‘स्नॅपचॅट’ही बंद केले. पुढे त्याने तिच्या ‘इन्स्टाग्राम’वर जानेवारी २०१७ मध्ये फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. त्याच्या ‘इन्स्टाग्राम’च्या अकाउंटवर तिचे आणि तिच्या मित्राचे फोटो ठेवून तिच्या मित्रमैत्रिणींनाही त्याने मेसेज पाठवले. नंतर, अनेक मुलांची नावे पाठवून ‘व्हॅलेंटाइन डे’ जवळ येत आहे, काळजी घे,’ असा मेसेज पाठवून तिला त्रास देणे सुरू केले. त्यानंतर, तिने ‘इन्स्टाग्राम’ही बंद केले. पुढे त्याने तिचे वडील आणि भावालाही मेसेज करून तिच्यासह तिच्या कुटुंबालाही मानसिक त्रास दिला. शिवाय, तिचे ‘इन्स्टाग्राम’ अकाउंट हॅक करून त्याद्वारे तिचे फोटो इतरांना पाठवून तिची फसवणूक आणि बदनामी केल्याप्रकरणी तिने त्याच्याविरुद्ध १ जून २०१७ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी चिवटपणे तपास करून दर्श याला मंगळवारी अटक केली.

Web Title: Snapechat, torture of thieves by hacking installagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.