चित्रपटनिर्माता पराग संघवीवरही संशयाचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:21 AM2018-06-05T01:21:01+5:302018-06-05T01:21:01+5:30

कुख्यात सट्टेबाज सोनू जालान याचा चित्रपटनिर्माता पराग संघवी भागीदार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. अरबाज खानपाठोपाठ पराग संघवी यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

 The skeptical cloud of filmmakers Parag Sangvi too | चित्रपटनिर्माता पराग संघवीवरही संशयाचे ढग

चित्रपटनिर्माता पराग संघवीवरही संशयाचे ढग

Next

- जितेंद्र कालेकर

ठाणे : कुख्यात सट्टेबाज सोनू जालान याचा चित्रपटनिर्माता पराग संघवी भागीदार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. अरबाज खानपाठोपाठ पराग संघवी यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
क्रिकेटवर सट्टा लावणारे देशभरातील ९८ सट्टेबाज सोनूच्या संपर्कात असल्याची माहितीही उघड झाली. चौकशीदरम्यान अरबाजनेही त्याच्याकडे दोन कोटी ८० लाखांचा क्रिकेटवर सट्टा लावल्याची माहिती पुढे आली. अरबाज या प्रकरणामध्ये महत्त्वाचा साक्षीदार ठरणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनू आणि पराग संघवी यांच्यातही सट्टा व्यवसायात भागीदारी आहे. त्यातील काही दुवे पोलिसांना मिळाले, तर काही माहिती सोनूकडून पोलिसांना मिळाली. याचीच खातरजमा करण्यासाठी आता संघवी यांनाही पाचारण केले जाणार आहे.

मैत्रिणीला फ्लॅट
सोनूला क्रिकेटवरील सट्ट्यातील पैशांतून करोडो रुपयांची कमाई झाली आहे. त्यातूनच त्याने एका बारबाला मैत्रिणीला गोरेगाव येथे एक वन बीएचके फ्लॅटही घेऊन दिल्याची माहिती उघड झाली आहे.

पण हिशेबच नाही...
अरबाज खान सोनूकडे किक्रेटवर सट्टा खेळला असला, तरी त्याच्याकडे याबाबतचा कोणताही तपशील नव्हता. त्याने अचानक अरबाजला दोन कोटी ८० लाख रुपये देणे बाकी असल्याचे सांगितले. तेव्हा अरबाजने हिशेब मागितल्यावर त्याला या व्यवहाराची जुळवाजुळव करता आली नाही. अखेर, या संपूर्ण कथित बाकी रकमेइतका म्हणजे दोन कोटी ८० लाखांच्या रकमेचा अरबाजला सोनूने पुन्हा सट्टा लावण्यास भाग पाडले. अरबाज यात जिंकला. त्यामुळे हा हिशेब बरोबर झाल्याचा दावा अरबाजने पोलिसांकडे केला.

Web Title:  The skeptical cloud of filmmakers Parag Sangvi too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा