आरटीई प्रवेशाची सहावी फेरी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 05:18 AM2018-10-05T05:18:02+5:302018-10-05T05:18:22+5:30

पाचव्या फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवड : पालकांचा प्रतिसाद कमी

Sixth round of RTE admission canceled | आरटीई प्रवेशाची सहावी फेरी रद्द

आरटीई प्रवेशाची सहावी फेरी रद्द

googlenewsNext

ठाणे : दर्जेदार इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत २५ टक्के जागा आरक्षित आहेत. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये १६ हजार ५४६ जागा राखीव आहेत. त्यापैकी आतापर्यंतच्या चौथ्या फेरीअखेर सुमारे सहा हजार ३५८ जागांवर प्रवेश झाले. याप्रमाणेच केजी ते पहिलीच्या प्रवेशासाठी पाचव्या फेरीत १५९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांचे प्रवेश सुरू आहेत. पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रवेशासाठीची सहावी फेरी घेतली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

पाचव्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपलेली आहे. त्यामुळे पालकांनी त्वरित संबंधित शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. प्रवेशासाठी निवड झालेल्या १५९ विद्यार्थ्यांपैकी प्रायमरी केजीसाठी ३६ विद्यार्थी, ज्युनिअर केजीसाठी ११४, सिनिअर केजीसाठी तीन आणि पहिलीसाठी सहा विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्यांचे प्रवेश संबंधित शाळांमध्ये घेतले जात आहेत. पालकांनी बालकांचे प्रवेश त्वरित घेण्याची अपेक्षा शिक्षण विभागाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता सहावी प्रवेश फेरी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. जिल्हाभरात अद्याप ११ हजार ४७० जागा रिक्त आहेत. प्रवेशास विलंब झाल्यामुळे पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले.

लाखो रुपये खर्च करून दर्जेदार शिक्षण देणाºया इंग्रजी व अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांचे केजी ते पहिलीच्या वर्गाचे प्रवेश श्रीमंत पालक घेतात. आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारातील मुलामुलींनादेखील या शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेश राखीव ठेवले आहेत. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही या राखीव जागांची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. त्यास पालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची बाब चौथ्या फेरीअखेरही उघड झाली. या फेरीमध्ये २७६ बालकांचे प्रवेश निश्चित केले होते. त्यापैकी केवळ ६७ बालकांचे प्रवेश घेण्यात आले. उर्वरित पाच अर्ज फेटाळले असून २०६ बालकांच्या आईवडिलांनी संबंधित शाळांमध्ये संपर्कच साधला नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

अद्याप ११ हजार ३११ प्रवेश शिल्लक

च्प्लेग्रुप, प्रीकेजी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि फर्स्ट म्हणजे पहिलीच्या वर्गात या २५ टक्के आरक्षणातून बालकांना मोफत प्रवेश आहे.
च् शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाºया ६४० शाळांमध्ये या ११ हजार ४७० जागा आजपर्यंत शिल्लक आहेत. पहिल्या दोन फेºयांद्वारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.

च्आता तिसºया फेरीअखेर निवडलेल्या ९३९ पैकी ३४५ जणांचे प्रवेश झाले. उर्वरित ४७६ जणांनी प्रवेश घेतला नाही. आता चौथ्या फेरीत केवळ ६७ बालकांचे प्रवेश झाले आहेत.
च्या पाचव्या फेरीतील सर्व प्रवेश झाले, तरीही यंदा ११ हजार ३११ प्रवेश शिल्लक राहणार आहेत. पालकांचा प्रतिसाद
मिळत नसल्यामुळे या पाचव्या फेरीतील प्रवेशानंतर यंदाच्या आरटीईचे प्रवेश थांबवण्याच्या हालचाली सुरू झाल्या
आहेत.
 

Web Title: Sixth round of RTE admission canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे