शिवसेनेचा विरोध डावलून बुलेट ट्रेनला पायघड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 05:42 AM2018-07-21T05:42:38+5:302018-07-21T05:42:47+5:30

Shiv Sena protested against the bullet train | शिवसेनेचा विरोध डावलून बुलेट ट्रेनला पायघड्या

शिवसेनेचा विरोध डावलून बुलेट ट्रेनला पायघड्या

Next

- अजित मांडके 
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील प्रस्तावित मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे प्रस्तावित स्थानक ठाणे महापालिका क्षेत्रातील म्हातार्डी येथे होणार आहे. त्या परिसराचा विकास करण्यासाठी बुलेट प्रकल्पाला ठाणे महानगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी जपानी शिष्टमंडळास दिली.
आयुक्त एवढ्यावरच थांबले नाहीत, तर महापालिकेने प्रस्तावित केलेल्या पीआरटीएस मार्गिका बुलेट ट्रेनच्या म्हातार्डी अर्थात ठाणे स्थानकाजवळ संलग्न करता येईल का ? त्यासाठी जपानी तंत्रज्ञानाचा काही वापर करता येईल का, याबाबतही त्यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा केली.
बुलेट ट्रेनविरोधात भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मोठी आघाडी उघडून पंतप्रधान मोदींवर कठोर टीका केलेली असताना त्यांच्याच पक्षाची एकहाती सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेतील प्रशासनाने बुलेट ट्रेनसाठी पायघड्या पसरल्याचे दिसले. यामुळे महापालिकेतील शिवसेनेचे सत्ताधारी याबाबत काय भूमिका घेतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी सकाळी जपानचे शुन्तारो कवाहरा यांच्या नेतृत्वाखाली जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीचे मिहीर सोटी, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हाय स्पीड रेल निगम लि.चे प्रकल्प व्यवस्थापक आर.पी. सिंह यांनी आयुक्त जयस्वाल यांची भेट घेऊन प्रस्तावित बुलेट ट्रेन स्थानकाविषयी सविस्तर चर्चा केली. तसेच या प्रकल्पाचे सादरीकरण केले.
>महापालिकेने प्रस्तावित केलेल्या पीआरटीएस मार्गिका बुलेट ट्रेनच्या म्हातार्डी स्थानकाजवळ संलग्न करता येईल का, याबाबत शहर व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर आणि शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.
मनसेसह काँगे्रस-राष्ट्रवादी अंधारात
बुलेट ट्रेनला सुरुवातीपासून विरोध करणाºया काँगे्रस-राष्ट्रवादीसह तिचे सर्वेक्षण उधळून लावणारी मनसे यासारखे पक्ष हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन आणि जपानी शिष्टमंडळ शहरात येऊनसुद्धा अंधारात होते. सर्व पक्ष महासभेत स्वीकृत सदस्यपदी कुणाची वर्णी लागेल, यात गर्क होते. परंतु, शिष्टमंडळ येऊन गेल्यानंतर मनसेला जाग आली असून त्यांनी महाराष्टÑ नवनिर्माण सेना याला आपल्या पद्धतीने विरोध करेल, अशी भूमिका घेतली आहे.
>विकास योजनेत बदल करणार
केंद्र शासनाच्या वतीने मुंबई उपनगरे ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे. त्यातील चार स्थानके महाराष्ट्रात येतात. यामध्ये मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर यांचा त्यात समावेश आहे. ठाणे शहरामध्ये म्हातार्डी येथे हे स्टेशन प्रस्तावित आहे. या स्टेशनचा आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी विकास योजनेमध्ये बदल करणे आवश्यक आहेत, ते करण्याची ग्वाही आयुक्तांनी दिली.

Web Title: Shiv Sena protested against the bullet train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.