हत्येच्या गुन्ह्यातील चार वर्षे फरार आरोपीस शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून केली अटक

By नितीन पंडित | Published: February 28, 2024 05:41 PM2024-02-28T17:41:43+5:302024-02-28T17:42:19+5:30

हत्या करण्याच्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत मुसक्या आवळल्या आहेत.

shantinagar police has arrested an accused who has been absconding for four years in the crime of murder from uttar pradesh | हत्येच्या गुन्ह्यातील चार वर्षे फरार आरोपीस शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून केली अटक

हत्येच्या गुन्ह्यातील चार वर्षे फरार आरोपीस शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून केली अटक

नितीन पंडित, भिवंडी :  शहरातील शांतीनगर परिसरात गोळीबार करून एकाची हत्या करण्याच्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे अटक आरोपी हा उत्तर प्रदेश येथे गँगस्टर म्हणून कुप्रसिद्ध होता अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.वकिल उर्फ सानु अब्बास मन्सुरी असे अटक आरोपीचे नाव आहे.

 शांतीनगर परिसरात राहणारे सत्तार मंसुरी यांच्या उत्तरप्रदेश फुलपुर,जिल्हा प्रयागराज येथील जमिनीच्या वादातुन गुलजार नगर येथे उत्तरप्रदेश येथील आरोपींनी कट रचुन दिवसाढवळ्या गोळ्या घालुन हत्या केली होती.याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शांतीनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती.पण मुख्य आरोपी वकिल उर्फ सानु अब्बास मन्सुरी हा गुन्हा झाल्या पासून चार वर्षे फरार होता.गुप्त बातमीदार कडून वकिल उर्फ सानु अब्बास मन्सुरी हा उत्तर प्रदेश राज्यातील फुलपुर जिल्हा प्रयागराज परिसरात असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे भिवंडी  पोलीस उपायुक्त डॉ श्रीकांत परोपकारी ,पूर्व विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे व शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे व पोलिस कर्मचारी श्रीकांत धायगुडे,रूपेश जाधव,प्रशांत बर्वे,पोलिस हवालदार संतोष मोरे,रिजवान सैय्यद,किरण मोहिते,दिपक सानप,मनोज मुके यांचे पथक तपासासाठी उत्तरप्रदेश येथे रवाना झाले.फुलपुर, पोलीस ठाणे, प्रयागराज यांचे मदतीने पोलिस पथकाने फरार आरोपी वकिल उर्फ सानु अब्बास मन्सुरी याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेत अटक केली आहे.अटक आरोपी वकिल उर्फ सानु अब्बास मन्सुरी हा फुलपुर पोलीस ठाणे, प्रयागराज येथील गॅगस्टर आरोपी असुन त्याच्या विरोधात उत्तर प्रदेश येथील विविध पोलिस ठाण्यात खुन, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाच्या सात गुन्ह्यांची नोंद आहे.

Web Title: shantinagar police has arrested an accused who has been absconding for four years in the crime of murder from uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.