दुसऱ्यांदा चूक झाली की पुन्हा संधी मिळत नाही : जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 03:43 PM2018-09-30T15:43:58+5:302018-09-30T15:46:57+5:30

कोकण इतिहास परिषद, आनंद विश्व गुरु कुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ. दाऊद दळवी स्मृती व्याख्यानमालेचे (पुष्प दुसरे) आयोजन करण्यात आले होते.

Second time wrongdoing or not getting chance again: District Collector Rajesh Narvekar | दुसऱ्यांदा चूक झाली की पुन्हा संधी मिळत नाही : जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

दुसऱ्यांदा चूक झाली की पुन्हा संधी मिळत नाही : जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

googlenewsNext
ठळक मुद्देदुसऱ्यांदा चूक झाली की पुन्हा संधी मिळत नाही : जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरकै. डॉ. दाऊद दळवी स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प पहिला क्षण हुकल्यावर दुसरा क्षण टिपला तर यश नक्की मिळते : डॉ. आनंद देशमुख

ठाणे : कोकण इतिहास परिषद, आनंद विश्व गुरु कुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. डॉ. दाऊद दळवी स्मृती व्याख्यानमालेत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, एकदा चूक झाली की दुसºयांदा संधी मिळते पण दुसºयांदा चूक झाली की पुन्हा संधी मिळत नाही. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर केल्यावर खुप चांगले आयुष्य जगता येते. ज्या माणसाचे छंद आणि व्यवसाय एक आहे त्याच्यासारखा जगात सुखी माणूस नाही.
ही व्याख्यानमाला महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर हे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणुन उपस्थित होते. पुर्वी ठाणे हे व्याख्यानाचे शहर होते. आजच्या मुलांना इतिहास कालबाह्य झाला असे वाटते. हा समज ३० ते ३५ वर्षांपुर्वी उदयास आला आणि आता ही परिस्थीती सत्य असल्याचा त्यांना वाटत आहे. एकदा अवकाशात झेप घ्यायचे ठरवले की त्या आकाशाची उंची किती आहे याचा विचार करु नका ते गाठायचे ठरले तर निश्चित गाठा असे सांगत त्यांनी आपले अनुभव कथन केले. इतिहास आणि मराठी हे दोन्ही विषय माझ्या आवडीचे होते. जेव्हा या विषयांकडे वळलो तेव्हा तो ध्यास निर्माण झाला. १२ - १४ तास या विषयांचा अभ्यास करु लागलो. त्यानंतर इतिहासात एमए करायचे ठरविले. याच विषयात पीएचडी करण्यासाठी केंद्र सरकारची फेलोशिप देखील मिळाली. डॉक्टर, इंजिनिअर हीच क्षेत्र करिअर नाहीत. जर आवड असेल तर सामाजिक शास्त्रातील विषयाला तेवढीच गती मिळते. दुर्दैवाने पीएचडी करण्याची माझी इच्छा अपुर्ण राहीली परंतू ठाण्यात आल्यावर ही इच्छा पुर्ण करायला हरकत नाही. इतिहास व मराठी वाड्.मय हे विषय घेऊन जो प्रवास सुरू झाला तो विद्यार्थी या पदावरुन जिल्हाधिकारी या पदावर येईपर्यंत ३० वर्षे लागली असे त्यांनी सांगितले. प्रमुख वक्ते म्हणुन उपस्थित असलेले ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. आनंद देशमुख म्हणाले की, इतिहास जगणारा शिक्षक विद्यार्थ्यांा इतिहास शिकवायला भेटला तर मुलांमध्ये या विषयाची आवड निर्माण होईल. पहिला क्षण हुकल्यावर दुसरा क्षण टिपला तर यश नक्की मिळते. इतिहास वेळोवेळी आंतरदृष्टी देते, नविन काहीतरी सुचवत असते. यावेळी कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रविंद्र लाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर प्रा. प्रदीप ढवळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी कोकण इतिहास परिषदेचे कार्यवाह सदाशिव टेटविलकर, विलास ठुसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. आदीत्य दवणे यांनी केले.

Web Title: Second time wrongdoing or not getting chance again: District Collector Rajesh Narvekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.