देशातील मोठा पॉवरलूम मेगा क्लस्टर भिवंडीत उभारण्यासाठी हालचाली !ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या प्रकल्पाविषयी सकारात्मक चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 05:15 PM2018-08-28T17:15:29+5:302018-08-28T17:20:42+5:30

जिल्हा प्रशासनाने समृद्धी महामार्ग, जेएनपीटी, दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरीडॉर यांचा विचार करून दळणवळणाच्या दृष्टीने योग्य जागेची निवड करावी. यासाठी सुमारे १५० एकर जागेची प्राथमिक आवश्यकता आहे. यामध्ये कॉमन फेसिलिटी सेंटर, पॉवरलूम प्रोसेसिंग, यार्न मार्केट, वर्क शेड्स आदींची आवश्यकता भासणार आहे. याशिवाय याठिकाणी वस्त्रोद्योगाशी संबंधित कौशल्य विकास केंद्रे असतील. पॉवरलूम आधुनिकीकरण योजना याठिकाणी राबविण्यात येतील. सुताचा पुरवठा ते कापडाची निर्यात या संपूर्ण पक्रियेसाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नसल्याची सकारात्मक चर्चा

 Movement to build big powerloom mega cluster in the country! Positive discussions about this project by meeting in Thane Collector Office | देशातील मोठा पॉवरलूम मेगा क्लस्टर भिवंडीत उभारण्यासाठी हालचाली !ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या प्रकल्पाविषयी सकारात्मक चर्चा

वस्त्रोद्योग सचिव अतुल पाटणे यांनी भिवंडी पॉवरलूम असोसिएशनच्या सदस्यांसमवेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

Next
ठळक मुद्देप्रथम १५० एकर भूखंडावर हा पॉवरलूम मेगा क्लस्टर उभारला जाणारहबसाठी जमीन उपलब्धतेसह अन्य गोष्टींसाठी प्राध्यक्रम देण्याचे आश्वासन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरयामध्ये कॉमन फेसिलिटी सेंटर, पॉवरलूम प्रोसेसिंग, यार्न मार्केट, वर्क शेड्स आदीं


ठाणे : देशातील सर्वात मोठे पॉवरलूम मेगा क्लस्टर भिवंडी येथे उभारण्याच्या दृष्टीने जोरदार पावले उचलण्यात आली आहेत. मंगळवारी वस्त्रोद्योग सचिव अतुल पाटणे यांनी भिवंडी पॉवरलूम असोसिएशनच्या सदस्यांसमवेत ठाणेजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या प्रकल्पाविषयी सकारात्मक चर्चा केली. सुमारे प्रथम १५० एकर भूखंडावर हा पॉवरलूम मेगा क्लस्टर उभारला जाणार आहे. मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होणाऱ्या या हबसाठी जमीन उपलब्धतेसह अन्य गोष्टींसाठी प्राध्यक्रम देण्याचे आश्वासन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिले.
पॉवरलूम मेगा क्लस्टर उभारण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीत भिवंडीत निर्यात प्रोत्साहनसंदर्भात एक कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने सुरु करण्यासाठी ही यावेळी चर्चा झाली. या बैठकीत वस्त्रोद्योग संचालक माधवी खोडे यांनी देखील या हबची माहिती देऊन आजच्या स्थितीचे महत्त्व पठवून दिले. एमआयडीसी स्पेशल पर्पज व्हेईकल करून त्या माध्यमातून या महत्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी झाल्यास विद्युत मंडळ, प्रदूषण नियंत्रण, महानगरपालिका, महसूल विभाग या व इतर शासकीय संस्थांशी समन्वय साधणे अधिक सोयीस्कर होईल असे पाटणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासनाने समृद्धी महामार्ग, जेएनपीटी, दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरीडॉर यांचा विचार करून दळणवळणाच्या दृष्टीने योग्य जागेची निवड करावी. यासाठी सुमारे १५० एकर जागेची प्राथमिक आवश्यकता आहे. यामध्ये कॉमन फेसिलिटी सेंटर, पॉवरलूम प्रोसेसिंग, यार्न मार्केट, वर्क शेड्स आदींची आवश्यकता भासणार आहे. याशिवाय याठिकाणी वस्त्रोद्योगाशी संबंधित कौशल्य विकास केंद्रे असतील. पॉवरलूम आधुनिकीकरण योजना याठिकाणी राबविण्यात येतील. सुताचा पुरवठा ते कापडाची निर्यात या संपूर्ण पक्रियेसाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नसल्याची सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली.

* कालबध्द रीतीने कार्यवाही व्हावी -
भिवंडी येथे सुमारे सात लाख पॉवरलूम्स आहेत. त्यात दहा लाखांपेक्षा जास्त कामगार थेट रोजगार मिळवितात अप्रत्यक्षरित्या ४० लाख लोकांचा जीवन चिरतार्थ या उद्योगावर आहे. देशातील एकूण यंत्रमागांपैकी ५० टक्के यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. त्यात भिवंडीचा सर्वात अधिक वाटत आहे. पॉवरलूम संस्थांचे बळकटीकरण, कामगारांचे कल्याण मंडळ, यंत्रमाग संजीवनी योजना, परकीय गुंतवणूक आदी माध्यमातून या क्षेत्राच्या समस्या दूर करण्यात येत आहेत. भिवंडी येथे मेगा क्लस्टरच्या उभारणीने या भागाचा चेहरा मोहरा बदलेल मात्र कालबध्द रीतीने याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी या बैठकीस उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी केली.
भिवंडीतील पायाभूत सुविधा, रस्ते, शौचालये आदी उपलब्ध करणे या बाबींवर देखील लक्ष केंद्रित करावे असे भिवंडी पद्मानगर पावरलूम व्हीवर्सचे अध्यक्ष पुरु षोत्तम वंगा, यांनी सांगितले. माजी आमदार माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांनी देखील वीज वितरण कंपनीच्या ( टोरेंट) समस्या मांडल्या. शहरातील रस्ते, पूल, स्वच्छता याबाबतीत प्राधान्याने कारवाई सुरु असून या मेगा क्लस्टरच्या दृष्टीने पूर्णपणे सहकार्य केले जाईल असे भिवंडी महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी सांगितले. सोयी सुविधांसंदर्भात सर्व प्रतिनिधींसमवेत ५ सप्टेंबर रोजी प्रांत कार्यालयात चर्चा करण्यात येईल भिवंडी प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसीचे अधिकारी आदींनी देखील आपली मते मांडली.

 

Web Title:  Movement to build big powerloom mega cluster in the country! Positive discussions about this project by meeting in Thane Collector Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.