पावसाची शेतीकामाला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 03:31 AM2018-07-09T03:31:59+5:302018-07-09T03:32:10+5:30

दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रविवारी पावसाने जराशी विश्रांती घेताच, ग्रामीण भागात भातलावणीला ठिकठिकाणी सुरुवात झाली.

 Sanjivani rainy farming | पावसाची शेतीकामाला संजीवनी

पावसाची शेतीकामाला संजीवनी

Next

ठाणे : दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रविवारी पावसाने जराशी विश्रांती घेताच, ग्रामीण भागात भातलावणीला ठिकठिकाणी सुरुवात झाली. शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे मात्र अद्याप तहानलेलीच आहेत.
रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी कमीअधिक पाऊस पडला. मागील २४ तासांच्या कालावधीत सरासरी १७९.३४ मिमी मुसळधार पावसाची नोंद झाली.
ठाणे शहरात एका जुन्या इमारतीच्या दोन मजल्यांसह एक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली असून सुदैवाने त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. शहरातील वंदना टॉकीजसमोर व अन्य ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
जिल्ह्यात मुसळधार पडलेल्या या पावसाची सरासरी १७९.३४ मिमी नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली. सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात ३८० मिमी, तर याखालोखाल कल्याण तालुक्यात २४५ मिमी, अंबरनाथला १९२, उल्हासनगरला १८६, ठाण्याला १२५, मुरबाडला ६७ आणि शहापूर तालुक्यात केवळ ६० मिमी पाऊस पडला आहे. मागील वर्षी १०१७.७० मिमी पाऊस पडला होता. त्या तुलनेत यंदा आतापर्यंत ११८२.२० मिमी म्हणजे सरासरी १६४.४६ मिमी जादा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये आतापर्यंत ४८.२५ टक्के पाऊस पडला आहे.
शहरांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात ११२ मिमी पाऊस पडला असून आतापर्यंत या धरणात ११८.५८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला. यामध्ये सध्या ५० टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी तो ५८ टक्के होता. भातसामध्ये केवळ ४४ मिमी, मोडकसागरमध्ये ११८, आंध्रात केवळ ५१ मिमी पाऊस सकाळी ८ वाजेपर्यंत पडला.
बारवी धरणात ५.५७ टक्के पाणीसाठा तयार झाला. आतापर्यंत या धरणात ७७५ मिमी पाऊस पडला. याप्रमाणेच भातसा धरणात दोन दिवसांच्या कालावधीत तीन टक्के पाणीसाठा वाढून तो ४५ टक्के झाला. मागील वर्षी या दिवसापर्यंत भातसामध्ये ५३ टक्के पाणीसाठा होता. मोडकसागरमध्ये ७९ टक्के पाणीसाठा तयार झाला. मागील वर्षी तो केवळ ६५ टक्के होता.

जुन्या इमारतीचे दोन मजले कोसळले

ठाणे शहरातील शाहू मार्केटजवळील जुन्या इमारतीचे दोन मजले पडले. ही धोकादायक इमारत असल्यामुळे त्यात कोणीही रहिवासी नव्हते. त्यामुळे सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायंकाळच्या सुमारात ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री ही इमारत पाडण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात ३८० मिमी, तर याखालोखाल कल्याण तालुक्यात २४५ मिमी, अंबरनाथला १९२, उल्हासनगरला १८६, ठाण्याला १२५, मुरबाडला ६७ आणि शहापूर तालुक्यात केवळ ६० मिमी पाऊस पडला आहे.

दरड कोसळण्याच्या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून भिवंडी तालुक्यातील नारपोली येथील अजमेरनगर टेकडीवरील २६ कुटुंबांतील १५६ नागरिकांना रविवारी नारपोली येथील पालिकेच्या शाळेत स्थलांतरित केले आहे.
 

Web Title:  Sanjivani rainy farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.