आंदोलनामुळे एसटीला ४५ लाखांचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 02:20 AM2018-08-11T02:20:57+5:302018-08-11T02:21:07+5:30

सकल मराठा समाजाने गुरुवारी पुकारलेल्या महाराष्टÑ बंदमुळे राज्य परिवहन विभागाच्या ठाणे विभागाला सुमारे ४० ते ४५ लाखांचा भुर्दंड बसला आहे.

Rs.45 lakhs stolen from STL due to agitation | आंदोलनामुळे एसटीला ४५ लाखांचा भुर्दंड

आंदोलनामुळे एसटीला ४५ लाखांचा भुर्दंड

Next

ठाणे : सकल मराठा समाजाने गुरुवारी पुकारलेल्या महाराष्टÑ बंदमुळे राज्य परिवहन विभागाच्या ठाणे विभागाला सुमारे ४० ते ४५ लाखांचा भुर्दंड बसला आहे. दिवसभरातील चार हजार ३६७ फेऱ्यांपैकी दोन हजार ६१५ फेºया रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्टÑ बंदमधून ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई वगळण्यात आले होते. तरीदेखील बंद असल्याचे समजून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले होते. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी डेपोंवर नेहमी होणारी गर्दी गुरुवारी दिवसभरात कोणत्याच डेपोवर दिसत नव्हती. ज्या मार्गांवर प्रवासी होते, त्याच मार्गांवर परिवहन विभागाने एसटी बस सोडण्यास प्राधान्य दिले. ज्या मार्गांवर प्रवासी नाहीत, त्या मार्गांवरील बस फेºया रद्द करण्याचा निर्णय विभागाने घेतला होता.
ठाणे विभागाच्या शेड्युलप्रमाणे अंदाजे ६०० बसेस दररोज एक लाख ७० हजार ते एक लाख ८० हजार किलोमीटर अंतर कापतात. स्थानिक आणि राज्यभरात जाणाºया बसच्या एकूण चार हजार ३६७ फेºया नियोजित होत्या. त्यातून दररोज अंदाजे ६० लाखांच्या जवळपास उत्पन्न ठाणे विभागाला मिळते.
मात्र, दररोजच्या नियोजित चार हजार ३६७ फेºयांपैकी दोन हजार ६१५ फेºया रद्द झाल्यामुळे एक लाख ३३ हजार ४५९ किलोमीटर प्रवास दिवसभरात होऊ शकला नाही. त्यातूनच ठाणे एसटी विभागाचे अंदाजे ४० ते ४५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>रद्द केलेल्या फेºयांमध्ये ठाणे-१ डेपो आघाडीवर
एकूण आठ डेपोमधून गुरुवारी दिवसभरात तेथील एकूण दोन हजार ६१५ फेºया रद्द झाल्या. यामध्ये सर्वाधिक फेºया या ठाणे-१ या डेपोतून रद्द झाल्या. त्यांची संख्या अंदाजे ५०० ते ५५० इतकी आहे. त्यापाठोपाठ ठाणे-२ या डेपोच्या ४५० फेºया रद्द झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>बंदमुळे नागरिक बाहेरच पडले नाहीत. प्रवासी संख्या नसल्याने बसफेºया रद्द कराव्या लागल्या. त्यातूनच, दिवसभरात दोन हजार ६१५ फेºया रद्द झाल्याने गुरुवारच्या उत्पन्नावर परिणाम झाला. त्यामुळे अंदाजे ४० ते ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
- शैलेश चव्हाण, विभागीय नियंत्रक, ठाणे एसटी परिवहन विभाग

Web Title: Rs.45 lakhs stolen from STL due to agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.