बनाव करून दरोडा टाकणारी पाचजणांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 03:53 AM2018-08-30T03:53:57+5:302018-08-30T03:54:16+5:30

ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई : लायटरच्या पिस्तुलाचा दाखवला धाक

The robbery made five gang members robbing | बनाव करून दरोडा टाकणारी पाचजणांची टोळी जेरबंद

बनाव करून दरोडा टाकणारी पाचजणांची टोळी जेरबंद

Next

ठाणे : आयकर आणि पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ठाणे ग्रामीण पोलिसांनीअटक केली. त्यांच्याकडून चोरलेल्या पावणेतीन लाखांच्या रोकडसह १० तोळे सोन्याचे दागिने असा पावणेसहा लाखांचा ऐवज हस्तगत केला असून दरोडेखोरांनी दरोडा टाकताना लायटरच्या पिस्तुलाचा धाक दाखवल्याचे तपासात पुढे आल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी बुधवारी ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

काशिमीरा येथील जुना म्हाडा, ओमकार टॉवर येथे राहणारे गोविंद सिंग हे आपल्या पत्नीसह घरात असताना ५ आॅगस्ट रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास तिघे जण आले. त्यांनी आयकर आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून घरात प्रवेश केला. त्यानंतर, सिंग आणि त्यांच्या पत्नीला पिस्तुलाचा धाक दाखवून नायलॉनची रस्सी तसेच चादरीने त्यांचे हातपाय व तोंड बांधून ठेवले. तसेच घरातील तीन लाखांच्या रोकडसह १० तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी वेगवेगळी पथके तयार करून त्या पथकांसह स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपासाला सुुरुवात केली. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्यांची ओळख पुढे आल्यावर २६ आॅगस्ट रोजी मुख्य आरोपी फय्याज कदर काझी (४७, रा. चिंचवड) याला पुण्यातून अटक केली.

मुख्य आरोपी भंगारविक्रेता तर इतर दोघे वेटर
च् मानव सुशील सिंग (१९, रा. मीरा रोड), शोएब मन्सुर मुन्शी (१९ रा. मीरा रोड), सलीम ऊर्फ साहिल फिरोज अन्सारी (२१, मध्य प्रदेश) आणि इम्रान मुन्ना अली (२५, मुंब्रा) या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ७५ हजारांची रोकड आणि १० तोळे सोन्याचे दागिने असा पाच लाख ७५ हजारांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यासाठी वापरलेले पिस्तूल, हॅण्डग्लोव्हज,मोबाइल फोन हस्तगत केले आहे.

च्मुख्य आरोपी फय्याज हा भंगारविक्रेता असून सलीम आणि इम्रान हे वेटर आहेत. तसेच मानव याच्यावर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. फय्याज, सलीम आणि इम्रान या तिघांनी पोलीस आणि आयकर असल्याचे सांगून घरात प्रवेश केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपास काशिमीरा पोलीस करत आहेत.

Web Title: The robbery made five gang members robbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.