शिक्षणाचा हक्काच्या माेफत शालेय प्रवेशासाठी ठाणे जिल्ह्यातील २६१५ शाळांची नाेंद  

By सुरेश लोखंडे | Published: April 4, 2024 05:56 PM2024-04-04T17:56:53+5:302024-04-04T17:56:53+5:30

आठ शाळांकडून विलंब.

registration of schools by offering admission under the right to education act has been done across thane | शिक्षणाचा हक्काच्या माेफत शालेय प्रवेशासाठी ठाणे जिल्ह्यातील २६१५ शाळांची नाेंद  

शिक्षणाचा हक्काच्या माेफत शालेय प्रवेशासाठी ठाणे जिल्ह्यातील २६१५ शाळांची नाेंद  

सुरेश लोखंडे, ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली माेफत शालेय प्रवेश देणाऱ्या शाळांची नाेंद (रजिस्टेशन) जिल्ह्याभरातून करण्यात आली आहे. एक वेळ मुदत वाढ देण्यात आली आहे. या मुदती अखेर आजपर्यंत दाेन हजार ६१५ शाळांची नाेंद सर्व शिक्षण अभियानाव्दारे करण्यात आली. उर्वरीत आठ शाळांनी या मुदती अखेरही त्यांची नाेंद केली नसल्याची बाब घडकीस आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षासाठी आरटीईच्या २५ टक्के माेफत शालेय प्रवेशासाठी जिल्ह्याभ्राताील शाळांकडून रजिस्टेशन करून घेतले जात आहे. शासनाच्या नियमास अनुसरून आजपर्यंत दाेन हजार ६१५ शाळांचे रजिस्टेशन करण्यात आले आहे. मात्र या मुदतीत अजून आठ शाळांचे रजिस्टेशन बाकी आहे. त्यांना मुदत वाढ मिळण्याची शक्यता नसल्याचे बाेलले जात आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा शाळांची ही सख्या तिप्पट झाली आहे. गेल्या वर्षी अवघ्या ६२९ शाळांचा समावेश हाेता. त्यातुलनेत यंदा या शाळांची संख्या वाढली आहे.

मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुब्रल् घटकातील मुलांना या आरटीईच्या कायद्याखाली जवळच शाळेत केजी ते पहिलीच्या वर्गात माेफत प्रवेश दिला जात आहे. यंदा राज्य शासनाने त्यात सुदाधरणा केलेली आहे. त्यास अनुसरून यंदा या शाळांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्यात किती र्ना माेफत प्रवेश मिळणार ही संख्या मात्र जिल्ह्यात अजूनही उघडा झालेली नाही. मात्र संबंधित शाळेच्या एकूण प्रवेशापैकी तब्बल २५ टक्के शालेय प्रवेश या आरटीई कायद्याखाली माेफत देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील ६२९ शाळांनी १२ हजार २६७ जागा उपलब्ध करून दिल्या हाेत्या. त्यासाठी तब्बल ३० हजार ५५७ बालकांनी आनलाइन अर्ज दाखल केले हाेते.

Web Title: registration of schools by offering admission under the right to education act has been done across thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.