शेतक-यांच्या आत्महत्या थांबवणार, पाक व्याप्त काश्मीरसाठीही प्रयत्न करणार - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 01:52 AM2017-12-09T01:52:35+5:302017-12-09T01:53:04+5:30

शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्याने आपणास खायला मिळते. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटुंबे अ‍ॅटॅक येऊन मरतील. त्यामुळेच देशातील १२५ कोटी जनतेला जगवणा-या...

Ramdas Athavale will try to stop the farmers' suicides, Kashmir will also try for Kashmir - Ramdas Athavale | शेतक-यांच्या आत्महत्या थांबवणार, पाक व्याप्त काश्मीरसाठीही प्रयत्न करणार - रामदास आठवले

शेतक-यांच्या आत्महत्या थांबवणार, पाक व्याप्त काश्मीरसाठीही प्रयत्न करणार - रामदास आठवले

Next

सुरेश लोखंडे
ठाणे : शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्याने आपणास खायला मिळते. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटुंबे अ‍ॅटॅक येऊन मरतील. त्यामुळेच देशातील १२५ कोटी जनतेला जगवणा-या शेतक-यांना, शेतमजुरांना न्याय मिळावा, यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न सुरू आहेत. ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिली असून टप्प्याटप्प्याने त्याचा लाभ शेतकºयांना होईल. त्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
ठाणे जि.प. व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचार दौºयात शहापूर तालुक्यातील वासिंद येथील एका चौक सभेत ते बोलत होते. शेतकºयांप्रमाणेच दलितांच्या महामंडळांची सुमारे ८०० कोटींची कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासन विचार करत असल्याचे त्यांनी सूतोवाच केले. शेतीच्या सिंचनक्षमतेत वाढ करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला. यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊन परिणामी देशाचा विकास साधता येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने नितीन गडकरी यांना नद्या जोडण्याची, तर मला माणसे जोडण्याची जबाबदारी दिल्याचे त्यांनी हास्यविनोद करत स्पष्ट केले.
आमच्या मतांवर आम्ही पडतो... पण, ताबडतोब उभे राहतो. पडून राहण्याची सवय आम्हाला नाही... असा विनोद करून ते पुढे म्हणाले की, दलितांचे मतदान निर्णायक ठरत असल्याने आमच्या पाठिंब्यावर पक्षाचे उमेदवार निवडून येत असल्याचे त्यांनी काही उदाहरणे देऊन पटवून दिले. ‘देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत, तसे उद्धवजीही मित्र... पण, या दोघांतील बरे नाही चित्र’ असे यमक साधून या चौक सभेतील उपस्थितांना आठवलेंनी कविताही ऐकवल्या. अपोझिशनवाले मुसलमानों को भडकाते है... वो आपको लढाने का काम करते है... लेकिन हम आपको बढाने का काम करते है... असेही यमक जुळवून शेर ऐकवून त्यांनी मोदी सरकार मुसलमानांच्या हिताचे असल्याचे पटवून दिले.

संविधान बदलतील त्यांना आम्ही बदलणार
जीएसटीमुळे थोडा त्रास झाला. पण, त्यासाठी चांगल्या दोन सुधारणा झाल्या आहेत. आगामी या बजेटमध्ये त्यांचा समावेश होईल. नोटाबंदीचा थोडा त्रास झाला. दलितांचे आरक्षण जाणार, असे सांगून विरोधक दलितांमध्ये भीती घालत आहेत. बाबासाहेबांचे संविधान बदलणार असल्याचे सांगतात.पण, जे बाबासाहेबांचे संविधान बदलतील, त्यांना बदलण्याची ताकद आमच्यात आहे. बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे... संविधानामुळे ओबीसीतील तेली समाजाचा मी पहिला पंतप्रधान झाल्याचे मोदी यांनी सभागृहात सांगून संविधान बदलता येणार नसल्याची ग्वाही दिल्याचे आठवले म्हणाले. या वेळी व्यासपीठावर आ. नरेंद्र पवार उपस्थित होते.

Web Title: Ramdas Athavale will try to stop the farmers' suicides, Kashmir will also try for Kashmir - Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.