ठाणे जिल्ह्यातील मतदानाचा टक्का ७० टक्केवर नेण्यासाठी जनजागृतीचा फंडा जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 08:00 PM2019-04-16T20:00:42+5:302019-04-16T20:05:48+5:30

जिल्ह्यातील २४ हजार गृहनिर्माण सोसाय्यांमध्ये जनजागृती करणार, त्यासाठी ९८ रोटरी क्लबचे देखील सहकार्य घेणार. ठिकठिकाणी जाणाºया घंटागाडीला मतदान करण्याचे आवाहन करणारे आॅडीओ लोकाना ऐकवणार, रिक्षाच्या माध्यमातून आॅडीओ ऐकवणार. एसटी महामंडळाचे ६०० कर्मचाऱ्यांव्दारे आज शहरात जनजागृती.

 Public awareness fund to increase the percentage of voting in Thane district to 70 percent | ठाणे जिल्ह्यातील मतदानाचा टक्का ७० टक्केवर नेण्यासाठी जनजागृतीचा फंडा जोरात

मतदान करण्याच्या जनजागृतीसाठी बिबट्याचे चित्रे आयकॉन निश्चित

Next
ठळक मुद्देनिवडणुकीत कमीत कमी ७० टक्के मतदान मतदान व्हावे, अशी अपेक्षाजनजागृतीसाठी बिबट्याचे चित्रे आयकॉन निश्चितमतदान कमी झालेल्या विधानसभा कार्यक्षेत्रात ही जनजागृती

ठाणे : लोकसभेच्या मागील निवडणुकीला जिल्ह्यात अवघे ५० टक्के मतदान झाले होते. या फारच कमी झालेल्या या मतदानाचा टक्का या निवडणुकीत वाढवण्यासाठी आता जिल्ह्यात निवडणूक यंत्रणेव्दारे मोठ्या प्रमाणात जनजागृतीचा फंडा निवडला आहे.मतदान कमी झालेल्या विधानसभा कार्यक्षेत्रात ही जनजागृती विविध प्रध्दतीने करून मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. यात हलगर्जीपणा नको म्हणून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी कोकण विभागीय आयुक्ती जगदीश पाटील केंद्रीय निरीक्षक म्हणून लक्ष ठेवून आहे.
ठाणे शहर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समजून घेण्यासाठी सर्वच त्याकडे गांभीर्याने लक्ष देतात. याची जाणीव झालेल्या निवडणूक यंत्रणेने देखील मतदान करण्याच्या जनजागृतीसाठी बिबट्याचे चित्रे आयकॉन निश्चित केले आहे. बिब्यांच्या या चित्रासह नागरिकांना आकर्षित करणाºया विविध उपक्रमांव्दारे मतदानासाठी मतदारांमध्ये जनजागृती करणार असल्याचे या जनजागृती पथकाच्या उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी सांगितले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या या पत्रकार निवडणूक शाखा जिल्हा उपनिविडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आदी उपस्थित होते.
गेल्या निवडणुकीला जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण (६६.२३ टक्के), शहापूर (६५.७८टक्के) आणि मुरबाड ( ६३.३३ टक्के) या तिन विधानसभांमध्येच जास्त मतदान झाले. उर्वरित विधानसभांमध्ये अत्यल्प मतदान झाले आहे. याकडे लक्ष केंद्रीत उल्हासनगर (३८ टक्के), अंबरनाथ (३९ टक्के), भिवंडी ईस्ट (४४ टक्के), डोंबिवली (४४ टक्के) कळवा मुंब्रा (४७ टक्के), कल्याण (४४ टक्के) आदी विधानसभांमध्ये कमी मतदान झाले. यामुळे या विधानसभा कार्यक्षेत्रात मोठ्याप्रमाणात जनजागृती केली जाणार आहे.या लोकसभेच्या निवडणुकीत कमीत कमी ७० टक्के मतदान मतदान व्हावे, अशी अपेक्षा निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आली आहे. हा संकल्प पुर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेने जनजागृती उपक्रम हाती घेतले आहेत.
* स्वीप उपक्रम - जिल्ह्यातील २४ हजार गृहनिर्माण सोसाय्यांमध्ये जनजागृती करणार, त्यासाठी ९८ रोटरी क्लबचे देखील सहकार्य घेणार. ठिकठिकाणी जाणाºया घंटागाडीला मतदान करण्याचे आवाहन करणारे आॅडीओ लोकाना ऐकवणार, रिक्षाच्या माध्यमातून आॅडीओ ऐकवणार. एसटी महामंडळाचे ६०० कर्मचाऱ्यांव्दारे आज शहरात जनजागृती. १९ एप्रिलला रन फोर ओटर ही तीन किमी.ची रॅली शहरात काढणार. २२ ते २७ या दरम्यान कल्याण मतदार संघात दहा ठिकाणी जनजागृती करणार.२१ एप्रिलला उल्हासनगर, डोंबिवली, मुंब्रा, भिवंडी सायकल रॅली आहे. २४ ला फॅशमॉबव्दारे युवकांचे डॉन्स कार्यक्रम आणि २७ ते २८ या कालावधीत जेष्ठ नागरिक, महिला, मुले आदींची ठिकठिकाणी रॅली काढून मतदानासाठी जनजागृती केली जाणार आहे.
--------------

Web Title:  Public awareness fund to increase the percentage of voting in Thane district to 70 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.