मुंबई विद्यापीठाच्या नियंत्रणातील महाविद्यालयांमधील प्राध्यापक बारातास धरणो आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 03:38 PM2019-03-21T15:38:22+5:302019-03-21T15:43:58+5:30

बॉम्बे युनिवरसीटी अ‍ॅन्ड कॉलेज टिचर युनियन (बुक्टू) या संघटनेचे अध्यक्ष डॉ. गुलाब राजे व महासचिव डॉ. मधू परांजपे यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक धरणे आंदोलन छेडणार आहेत . मुंबई विद्यापीठाच्या नियंत्रणातील सर्व कॉलेजचे प्राध्यापक या आदांलनात सहभागी होतील. ठाणे, मुंबई, पालघर, रायगड आदी जिल्ह्यातील प्राध्यापक या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Professor Baratas Dharano will campaign for the students of the University of Mumbai | मुंबई विद्यापीठाच्या नियंत्रणातील महाविद्यालयांमधील प्राध्यापक बारातास धरणो आंदोलन छेडणार

वेतन निश्चितीसाठी प्राध्यापक महाविद्यालयांमध्ये व काही प्राध्यापक विद्यापीठाच्या प्रवेशव्दारवर जावून बारातास धरणो आंदोलन 22 मार्चला सकाळपासून छेडणार

Next
ठळक मुद्देसातव्या वेतन आयोगाच्या परिपत्रकानुसार विद्यापीठांनी वेतन निश्चितीमुंबई विद्यापीठाकडून शिक्षकांची होणारी छळवणूक त्वरीत थांबवण्यासहविद्यापीठ परिनियमातील रजा नियमांचे उल्लंघन करणा:या प्राचार्यांवर कारवाई

ठाणे  : राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या परिपत्रकानुसार विद्यापीठांनी वेतन निश्चिती करायची आहे. पण मुंबई विद्यापीठाच्या विविध कामकाजातील दिरंगाई व ढिसाळपणाचा आरोप करीत वेतन निश्चितीसाठी प्राध्यापक महाविद्यालयांमध्ये व काही प्राध्यापक विद्यापीठाच्या प्रवेशव्दारवर जावून बारातास धरणो आंदोलन 22 मार्चला सकाळपासून छेडणार आहेत
बॉम्बे युनिवरसीटी अ‍ॅन्ड कॉलेज टिचर युनियन (बुक्टू) या संघटनेचे अध्यक्ष डॉ. गुलाब राजे व महासचिव डॉ. मधू परांजपे यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक धरणे आंदोलन छेडणार आहेत . मुंबई विद्यापीठाच्या नियंत्रणातील सर्व कॉलेजचे प्राध्यापक या आदांलनात सहभागी होतील. ठाणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यातील प्राध्यापक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. काही प्राध्यापक विद्यापीठाच्या प्रवेशव्दारावरील आंदोलनात सहभागी होणार असून काही महाविद्यालयांच्या प्रवेशव्दारांवर आंदोलन छेडणार असल्याचे बुक्टूचे महासचिव डॉ. मधू परांजपे यांनी सांगितले.
सुमारे चार हजार पेक्षा जास्त शिक्षकांची वेतननिश्चितीच्या शिबिरांचे आयोजन मुंबई विद्यापीठ करू शकेल का अशी शंकाच बुक्टूला आहे. यास अनुसरून बुक्टू कार्यकारी समिती सदस्य, सिनेट व विद्या समिती (अकैडेमिक कौन्सिल) सदस्यांच्या बैठकीत तीव्र धरणो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये विविध समस्यांबाबत गंभीर अस्वस्थता आहे. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व त्यावर ठोस उपाययोजना करायला विद्यापीठास भाग पाडण्यासाठी शिक्षकांनी मोठय़ा संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे. तसेच प्रत्येक महाविद्यालयातील जास्तीत जास्त शिक्षकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बुक्टू चे अध्यक्ष डॉ. गुलाब राजे व महासचिव डॉ. मधू परांजपे यांनी केले आहे.
           मुंबई विद्यापीठाकडून शिक्षकांची होणारी छळवणूक त्वरीत थांबवण्यासह विद्यापीठ प्रशासनाने वारंवार आश्वासने देऊनही आश्वासित प्रगती योजना (कैस) शिबिरे आयोजित करण्यात आलेले अपयश, परीक्षा वेळापत्रकांचे गैरव्यवस्थापन व शैक्षणकि नियोजनाचे उल्लंघन, विद्यापीठ परिनियमातील रजा नियमांचे उल्लंघन करणा:या प्राचार्यांवर कारवाई करण्यात अपयश आदींच्या विरोधासह सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीसाठी वेळापत्रक त्वरीत तयार करावे या मागणीसाठी प्राध्यापक धरणे आंदोलन छेडणार आहेत. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंतच्या बारा तासांचे दीर्घ धरणो आंदोलन प्राध्यापक छेडणार असल्याचे डॉ. परांजपे यांनी सांगितले.

 

Web Title: Professor Baratas Dharano will campaign for the students of the University of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.