बाळासाहेब कलादालनास आडकाठी करू नका, प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांना खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 02:36 AM2018-08-18T02:36:10+5:302018-08-18T02:37:04+5:30

सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनास मंजुरी दिल्याने आगरी भवनवरून अडचणीत आलेल्या सत्ताधारी भाजपाच्या मदतीला आयुक्त धावले आहेत.

Pratap Sarnaik complains to the commissioner not to stop Balasaheb Kaladanas | बाळासाहेब कलादालनास आडकाठी करू नका, प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांना खडसावले

बाळासाहेब कलादालनास आडकाठी करू नका, प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांना खडसावले

Next

मीरा रोड - सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनास मंजुरी दिल्याने आगरी भवनवरून अडचणीत आलेल्या सत्ताधारी भाजपाच्या मदतीला आयुक्त धावले आहेत. सरकारी पत्राच्या एका ओळीचा फक्त खेळाच्या मैदानाची १५ टक्के जागा मंजूर झाल्याचा सोयीचा अर्थ काढल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी आयुक्तांची भेट घेऊन बाळासाहेब कलादालनाच्या कामात आडकाठी करू नका, असे खडसावले. आरक्षण क्र. २४६ मध्ये आगरी भवन उभारण्यासाठी आपण ७५ लाखांचा निधी जाहीर केला असून तसा प्रस्ताव तयार करा, अशी तंबी दिली. सामाजिक वनीकरणाचे शहरातील एकमेव आरक्षण असल्याची माहितीच पालिकेने सरकारपासून लपवून ठेवली.
भार्इंदर पूर्वेच्या आझादनगरजवळील आरक्षण क्र. १२२ या सामाजिक वनीकरण व खेळाच्या मैदानातील दोन एकर जागा आगरी भवनासाठी देण्याचा ठराव २०११ मध्ये महासभेने केला असता २०१४ मध्ये सरकारने तो फेटाळला होता. त्यानंतर, २०१६ मध्ये भाजपा व सेना युतीनेच या आरक्षणाच्या १५ टक्के जागेत बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनाचा ठराव केला होता.
मात्र, भाजपाने एकहाती सत्ता मिळवताच फेब्रुवारीमध्ये त्याच आरक्षणातील सहा हजार चौरस मीटर क्षेत्र वगळून ती जागा आगरी भवनसाठी देण्याचा ठराव बहुमताने केला. नगरविकास विभागानेच पालिकेच्या ताब्यात असलेल्या खेळाच्या मैदानातील मोकळ्या जागेवर कलादालन व सांस्कृतिक भवनचे बांधकाम करण्यास मंजुरी दिली. सामाजिक वनीकरण व खेळाचे मैदान असे सुमारे साडेचार हेक्टरचे आरक्षण असून त्याची विभागणी नाही. तसेच येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही झाले आहे.
सामाजिक वनीकरणासाठी एकमेव आरक्षण असून औद्योगिक वसाहती, निवासी संकुलांच्या तुलनेत येथे झाडेच नाहीत. त्यामुळे मध्यवर्ती भागात हे आरक्षण महत्त्वाचे असताना महापालिका आयुक्त मात्र याकडे डोळेझाक करत आहे. सरकारी पत्रानुसार आगरी भवनचा विषय बारगळण्याची चिन्हे दिसल्याने समाजात नाराजी पसरल्याने भाजपाची धावपळ सुरू झाली आहे. आयुक्त बालाजी खतगावकर सत्ताधाऱ्यांच्या मदतीला धावले असून त्यांनी फक्त खेळाच्या मैदानाच्या जागेतील १५ टक्के बांधकामास मंजुरी दिल्याचा अर्थ काढून सामाजिक वनीकरणाच्या जागेत आगरी भवन बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिल्याचे समजते. आयुक्तांनी नुकतीच संबंधित अधिकाºयांची बैैठकही घेतली होती.
बाळासाहेबांच्या स्मारकाआड येऊ नका, असे खडसावतानाच शिवसेना व काँग्रेसने सेव्हन स्क्वेअर शाळेमागील आरक्षण क्र. २४६ मधील १५ टक्के जागेत आगरी भवन उभारण्याचा ठराव केला होता. आगरी भवनासाठी आमदार निधीतून ५० लाख, तर व्यक्तिगत २५ लाख रुपये आपण जाहीर केले असून त्याचा प्रस्ताव तयार करा, असे सरनाईक यांनी सांगितले.
दरम्यान, यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपामध्ये राजकारण रंगणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.

सामाजिक वनीकरणाच्या आरक्षणाची सरकारला कल्पना

आयुक्त बालाजी खतगावकर यांनी मात्र सामाजिक वनीकरणाच्या एकमेव आरक्षणाची सरकारला माहिती असून त्याबद्दल सरकार ठरवेल.
या आरक्षणात एका बाजूला बाळासाहेब कलादालन, तर दुसºया बाजूला आगरी भवन बांधण्याचा प्रयत्न आहे, असे सांगितले.

Web Title: Pratap Sarnaik complains to the commissioner not to stop Balasaheb Kaladanas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.