ठाण्याच्या महाविद्यालयात रंगली विंदांच्या कवितांची काव्यमैफिल, प्राध्यापिका आणि विद्यार्थिनिंचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 03:55 PM2017-12-16T15:55:31+5:302017-12-16T16:02:08+5:30

विंदांच्या काव्यस्वभावातील वैविध्य आणि वैशिष्ट्य दर्शवणाºया अनेक कवितांचे सादरीकरण महाविद्यालयाच्याच विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी केले.

Poetry of poems written in the college of Thane, professor of proficiency and students participation | ठाण्याच्या महाविद्यालयात रंगली विंदांच्या कवितांची काव्यमैफिल, प्राध्यापिका आणि विद्यार्थिनिंचा सहभाग

ठाण्याच्या महाविद्यालयात रंगली विंदांच्या कवितांची काव्यमैफिल, प्राध्यापिका आणि विद्यार्थिनिंचा सहभाग

googlenewsNext
ठळक मुद्दे विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून काव्य मैफिल कवितांचे सादरीकरण महाविद्यालयाच्याच विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी केलेकाव्य मैफिलीत उलगडल्या विंदांच्या आठवणी

ठाणे: आॅगस्ट महिन्यात सुरू झालेल्या कविश्रेष्ठ विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ठाण्याच्या एन. के. टी. टी. महाविद्यालयात ‘मी तर बाबा झपाटलेला..’ हा त्यांच्याच कवितांच्या मुक्त मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मैफिलेचे आयोजन महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने केले होते.
या मैफिलीत ‘नुकते नुकते’, ‘थोडी सुखी थोडी कष्टी’ सारख्या प्रेम कविता, ‘सब घोडे बारा टक्के’, ‘माझ्या मना बन दगड’ सारख्या सामाजिक आशयाच्या कविता, ‘आयुष्याच्या छटा दर्शवणाºया आयुष्याला द्यावे उत्तर’, ‘घेता’ या कवितांना उपस्थित विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामध्ये दृकश्राव्य माध्यमातून विंदांना प्रत्यक्ष ऐकून विद्यार्थ्यांना या श्रेष्ठ कवीचे दर्शन घडले. मराठी भाषेचा सकस आणि समृद्ध अनुभव घ्यायचा असेल तर विंदांच्या कवितांना पर्याय नाही अशी विद्यार्थ्यांची प्रतिक्रि या कार्यक्र माच्या सुरूवातीला व्यक्त झाली. या कार्यक्र माची संकल्पना प्रा. अरुंधती पत्की आणि प्रा. आदित्य दवणे यांची होती. कार्यक्र माचे अध्यक्षपद महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कनक जयवंत यांनी भूषवले तर सूत्रसंचालन आणि बांधणी आदीत्य यांनी केली होती. या कवितांचे सादरीकरण अपर्णा ठाकूर,पल्लवी शहा, कनक जयवंत, धनश्री सावंत, दीपाली मूळमुळे या प्राध्यापिकांनी तर प्रणाली निवाते, विद्या मोंडे, अश्विनी निकम, प्राजक्ता कदम, लक्ष्मी मुगळोळी, सेजल पाटील, संपदा सरपोळे, वैष्णवी मोरे, प्राजक्ता चवरे, ग्रीमिषा डोंगरे या विद्यार्थींनींनी केले. यावेळी विंदांच्या स्वभावाची वैष्टीष्ट्य, त्यांचे किस्से, विंदा आणि सुमा करंदीकरांच्या आठवणी सांगत विंदा, पाडगावकर, वसंत बापट यांच्या या तिघांनी कविता महाराष्ट्रभर पोहचवली असल्याचे सांगितले.

 

Web Title: Poetry of poems written in the college of Thane, professor of proficiency and students participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.